पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथे सिन्नर तालुका कृषी विभाग यांचेमार्फत बीज प्रक्रिया व बीज पेरणी तंत्रज्ञान विषयी माहिती देण्यात आली. सद्या पावसाचे दिवस असून शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बीज पेरणी तंत्रज्ञान विषयी होणे गरजेचे असल्याने त्यांना सिन्नर तालुका कृषी विभागामार्फत माहिती देण्यात आली. यावेळी कृषी पर्यवेक्षक राजेंद्र दोडके यांनी शेतकऱ्यांना याबद्दल सविस्तर माहिती दिली. बीज प्रक्रिया व बीज पेरणी तंत्रज्ञान याबद्दल शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कृषी अधिकारी एस.बी. पाटील मंडल, कृषी सहाय्यक लक्ष्मण मलिक, श्रीमती वंदना कºहाडे यांनीही शेतकºयांना मार्गदर्शन केले. मोहन दवंगे, अशोक चिने, नीलकंठ बिडवे, भास्कर दवंगे, विलास दवंगे, दत्तू खांडगे, वाल्मीक दवंगे, अनिल एरंडे, राजेंद्र लोहाटे, रामनाथ एरंडे, दगु चिने, वाल्मिक चिने, वाल्मिक दवंगे, अनिल एरंडे, दत्तू खांडगे, नानासाहेब ढवण, किशोर सोमवंशी, भाऊसाहेब सोमवंशी, प्रकाश चिने यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
वारेगाव येथे शेतक-यांना बीज पेरणी तंत्रज्ञान मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 1:03 PM