लोकमत न्यूज नेटवर्कचांदोरी : सोयाबीनसह इतर पिके पेरण्यापूर्वी त्यावर बीजप्रक्रिया करणे महत्त्वाची ठरते, अशी माहिती निफाड तालुक्याचे कृषी अधिकारी बी.जी पाटील यांनी दिली.प्रतिकूल वातावरण आणि रासायनिक खते व कीटकनाशकांचा अवाजवी वापर यामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. पिकांवर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांचे नियंत्रण करण्यापेक्षा त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करणे फायदेशीर ठरते. अलीकडच्या काळात जमिनीतील बुरशी व इतर किडींमुळे पिकांवर मूळ कूज व खोड किड्यांचा प्रादुर्भाव होत आहे. यापासून बचाव करण्यासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.यावर्षी मान्सूला वेळेत सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या तालुक्यात सोयाबीन, मका, मूग, उडीद, ज्वारीसह इतर पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत ३० ते ४० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अलीकडच्या काळात कृषी निविष्ठाच्या किमती वाढल्याने किमती वाढल्याने उत्पादन खर्चही वाढला आहे. तुलनेत बाजारात मिळणारा भाव कमी असतो.उत्पादनात घटशेतकरी थायरमचा वापर न करता दे फेकून देतात, त्यामुळे जमिनीत पेरलेले बियाणे बुरशीजन्य रोगांना बळी पडते. सोयाबीनवर मूळ कूज, मर रोग किंवा खोड किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी पैसा, वेळ व श्रम खर्ची पडतात. एवढे करूनही उत्पादन घटते. जमिनीतील बुरशी उन्हाळ्याच्या तापमानामुळे नष्ट होत नसल्याने पिकांना बुरशीजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी बीजप्रक्रि या आवश्यक आहे, असे कृषी विभागाने सांगितले. जमिनीवरील बुरशीमुळे झाड बाल्यावस्थेत वाळते, काही झाडांची मुळं कुजतात त्यामुळे उत्पादन घटते. बीजप्रक्रि या केलेल्या सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.
मका पेरणीपूर्वी बीजप्रक्रि या करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 9:08 PM
चांदोरी : सोयाबीनसह इतर पिके पेरण्यापूर्वी त्यावर बीजप्रक्रिया करणे महत्त्वाची ठरते, अशी माहिती निफाड तालुक्याचे कृषी अधिकारी बी.जी पाटील यांनी दिली.
ठळक मुद्देपाटील : कीटकनाकांचा वापर टाळावा