ठाणगाव : नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाºया विश्रामगडावर मुंबई येथील मल्हार ट्रेकर्सच्यावतीने ५० विविध वृक्षाच्या बियांचे बीजारोपण करण्यात येऊन तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .मल्हार ट्रेकर्सच्या सर्व सदस्यांना गडाच्या पायथ्याशी दुर्ग मित्र अंकूर काळे यांनी गडाविषयी माहिती दिली. गडाच्या पायथ्याशी असणाºया तोफेपांसून बीजारोपन व साफसफाई करण्यास सुरु वात केली. विश्रामगडाचे स्वरूप भव्य-दिव्य असल्याने गडावर वृक्ष लागवडीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर जागा आहे. या परिसरात पावसाचे प्रमाणही जास्त असल्याने पावसाच्या पाण्यावर येणाºया विविध रोपाचे बीजारोपण करण्यात आले. पावसाळ्याच्या सुरूवातीला गडावरील वनसंपदा वाढावी या दृष्टीने कडुनिंब, सीताफळ, रामफळ, बोर आदी विविध जातीच्या वृक्षांच्या बियांचे रोपण करण्यात आले. त्यानंतर गडावरील गड देवता आंबा, निंबा व पट्टाई देवीची महापूजा व आरती करण्यात येऊन आंबरखाण्याजवळील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. आंबरखाण्या जवळील पाण्याच्या टाक्यातील साफसफाई करण्यात येऊन गडावर जमा केलेला केर-कचरा एकत्र करून गडाच्या खाली आणून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. पेटविण्यात आला.मुंबई येथील या मल्हार ट्रेकर्सच्या सदस्यांनी गडावर विविध प्रकारच्या रोपांचे बीजारोपण केले आहे. ट्रेकर्सचे सदस्य दर दोन महिन्यांनी विश्रामगडाला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रामदास भोर यांच्या मार्गदर्शनाखाली या ट्रेकर्सनी गडभ्रमंती केली. विश्रामगडाला ‘क’ दर्जा प्राप्त झाल्याने गड पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटकांची गर्दी वाढत आहे. गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी बससेवा सुरु करावी अशीही मागणी शिवभक्त करत आहे.
विश्रामगडावर मल्हार ट्रेकर्सकडून बीजारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 5:45 PM