लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आगामी जुलै महिन्याच्या प्रारंभी शासनस्तरावर राज्यात वनमहोत्सवांतर्गत वृक्षलागवड अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नाशिक वनविभागाकडून जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात शहरासह ग्रामीण भागात ‘रोपे आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. सर्वसामान्यांमध्ये वृक्षलागवड व संवर्धनाविषयी जागृती व्हावी, नागरिकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सवलतीच्या दरात भारतीय प्रजातीची रोपे या उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.वृक्षतोड व वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या वैश्विक तपमान वाढीचा धोका, पर्यावरणाचा ढासळणारा समतोल टिकविण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज आहे. वृक्षलागवडीबाबत जरी नागरिकांमध्ये जागरूकता असली तरी संवर्धनाबाबत मात्र अद्यापही उदासीनता दिसून येते.
वनविभागाचा ‘रोपे आपल्या दारी’ उपक्रम
By admin | Published: June 05, 2017 1:26 AM