शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

‘लोकमत’मधील फोटो पाहून ‘पाणी’ देण्यास धावले शासन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 12:05 PM

श्रीकांत भारतीय यांची हट्टीपाड्याला भेट; महिलांची कसरत टाळण्यासाठी दोन टाक्या, टँकरद्वारे पाणी

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही दुर्गम भागात पाणी अर्थात जीवनासाठी जीवच धोक्यात घालावा लागतो. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील हट्टीपाडा येथे अशीच जीवघेणी कसरत ‘लोकमत’ने टिपली आणि अत्यंत वस्तुस्थिती दर्शक छायाचित्रातून अनेकजण हेलावले. भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनीदेखील तातडीने अधिकाऱ्यांसमवेत हट्टीपाडा येथे भेट दिली आणि झिरप्यातील पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टाकीमध्ये टँकरने पाणी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याच नव्हे तर अन्य वाड्यापाड्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. 

नाशिक जिल्ह्यातील पेठ आणि सुरगाणा हे दोन्ही आदिवासी तालुके असून, भौगोलिक स्थितीमुळे येथे पाणी साठवणे शक्य नसते. त्यामुळे उन्हाळ्यात खोल गेलेल्या विहिरी, चारी आणि झिरपे शोधून त्यांना पाणी मिळवावे लागते. त्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते किंवा दऱ्याखोऱ्यातून अत्यंत धोका पत्करून खाली उतरावे लागते. पेठ तालुक्यातील हट्टीपाडा येथे अशीच गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.

या गावातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शासनाच्या वतीने या ठिकाणी झिरप्याच्या वर पाण्याच्या दोन टाक्या बसवण्यात येेणार असून, त्यात टँकरद्वारे पाणी टाकण्यात येेणार आहे. त्यामुळे आता हट्टीपाड्यातील लोकांची  तहान मिटण्याची आशा निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील हट्टीपाडा येथे अशीच जीवघेणी कसरत ‘लोकमत’ने १६ मे रोजी टिपली आणि अत्यंत वस्तुस्थिती दर्शक छायाचित्रातून अनेकजण हेलावले.पेठजवळील हट्टीपाडा येथील पाण्याच्या समस्येचा अत्यंत जिवंत फोटो ‘लोकमत’ने प्रसिद्ध केला. आम्ही राजकारणी असलो, तरी संवेदनशील आहोत. शासन संवेदनशील असल्याने मी आज या ठिकाणी भेट दिली. पंतप्रधान प्रत्येक घरात जल देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथेही जलजीवन मिशनच्या माध्यमातून कामे करण्याची गरज आहे, हे लक्षात आले. ‘लोकमत’ने छायाचित्रातून वस्तुस्थिती मांडल्याबद्दल आभारी आहे.- श्रीकांत भारतीय, आमदार 

टॅग्स :water shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाईNashikनाशिकGovernmentसरकार