संजय पाठक, नाशिक: कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी या जात नोंदणीबाबतकेवळ कागदपत्रांचीच छाननी न करता नाशिकमध्ये ज्या पध्दतीने पुरोहितसंघासारख्या संस्थांची मदत घेण्यात आली. त्याच धर्तीवर अन्यत्रही पुराेहित संघ आणि अन्य संस्थांची मदत घ्यावी. आणि येत्या ८ डिसेंबरपर्यंत नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपला अहवाल पाठवावा असे आदेश न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी दिले आहेत.
कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींनादेण्याबाबतची कार्यपद्धती निश्चीत करण्यासाठी समितीची बैठक समितीचेअध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकयेथील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी न्या. शिंदे यांनी हेनिर्देश दिले.
यावेळी नोंदी शोधण्यासाठी शासकीय विभागांनी तसेच इतर लिपीतील नोंदीबाबतसंबंधित भाषा जाणकारांची मदत घेण्यात यावी, अशा सूचना केल्या. विभागीयआयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संपूर्ण विभागाची माहिती देताना तपासण्यातआलेली कागदपत्रे व कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबीच्या आढळून आलेल्यानोंदीबाबतची माहिती दिली.