खामखेडा : चालू वर्षी सुरुवातीला पावसाने ओढ दिले. त्यामुळे खरीप पिकांची उशिरा पेरणी झाली. नंतर मात्र परतीच्या पावसाने खामखेडा परिसरामध्ये हुलवणी दिली आणि ऐन दाणे भरण्याच्या स्थितीत पिके असताना त्यांना पाण्याची गरज भासू लागली आहे. खामखेडा परिसरामध्ये उन्हाळी कांद्याकडे नगदी पिके म्हणून पाहिले जाते.मार्चमध्ये गारपिटीमुळे कांदा बियाणे ढोगळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे चालू वर्षी उन्हाळी कांदा बियाण्याची उणीव भासू लागली आहे. देवळा-सटाणा, कळवण आदि तालुक्यांमध्ये कांद्याचे बियाणे तयार झाले नाहीत. त्यामुळे शेतकरी उन्हाळी कांद्याच्या बियाणे शोधत होता. औरंगाबाद जिल्ह्यातून काही शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे आणले आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी औरंगाबाद-जालना आदि भागांमध्ये जाऊ लागल्याने सुरुवातीच्या किमतीमध्ये तेथेही वाढ करण्यात आली; परंतु आता काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा बियाणे टाकण्यास सुरुवात केली असता काही शेतकऱ्यांची बियाणे उगवले नाहीत, तर काही शेतकऱ्यांची बियाणे कमी प्रमाणात उगवली. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात क्षेत्र लागवड होणार नाही म्हणून पुन्हा कांदा बियाणाच्या शोधार्थ शेतकरी दिसून येत आहे.काही शेतकरी विविध कंपनीची बियाणे विकत घेत आहेत. परंतु गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षीपेक्षा किमतीमध्ये वाढ झाली आहे. परंतु एवढे करून पुढे कोणत्या प्रतीचा निघेल याची खात्री शेतकऱ्यांना नाही. या कांदा बियाण्याच्या तुटवड्यामुळे उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात घट होणार असा अंदाज दिसून येत आहे. (वार्ताहर)
बियाण्यांचा जाणवला तुटवडा
By admin | Published: October 16, 2014 10:25 PM