चांदवड : येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या आबड-लोढा-जैन-सुराणा महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे. प्राचार्य डॉ. जी.एच. जैन यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना महविद्यालयातील शारीरीक शिक्षण संचालक डॉ. दत्तात्रय शिंपी, प्रा. उत्तम जाधव, प्रा. अजय नायर यांचे मार्गदर्शन लाभले. सैन्यदलात, पोलीस दलात, बीएसएफ यासारख्या विविध विभागात दरवर्षी महाविद्यालयातील विद्यार्थी निवडले जातात. यावेळी मात्र एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी निवडले गेले ही पहिलीच वेळ आहे. अक्षय धर्मा सोमवंशी, विजय भाऊसाहेब शिंदे, महेश देवीदास आवारे, प्रवीण खंडेराव ठाकरे, हर्षल हिरामण आवारे, गोंविद दत्तू निकम, अभिषेक सोमनाथ वाळके, समाधान देवराम बरकले, प्रशांत संजय वाघ, अक्षय उत्तम कासव, किरण विष्णू सोमवंशी, प्रकाश अशोक खैरे, राहुल शिवराम कोतवाल, अक्षय नाना पिंपळे, मनोज कैलास मांदळे, राहुल दौलत बस्ते या विद्यार्थ्यांची सैन्यदलात निवड झाली. या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष संपतलाल सुराणा, मानद सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष अजितकुमार सुराणा, समन्वयक कांतीलाल बाफना, सीए महावीरचंद पारख आदींसह सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी स्वागत व सत्कार केला.
१६ विद्यार्थ्यांची सैन्यदलात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 5:39 PM