सातपूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय कार्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार व उद्योजकता मेळाव्यात ४८३ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित या मेळाव्यासाठी विविध २२ कारखान्यांकडून एक हजार ६४४ रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली होती. या उद्योगांच्या प्रतिनिधींनी उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक स्तरावर निवड केली. तत्पूर्वी मुलाखतीची पूर्व तयारी कशी करावी, मुलाखतीस कसे सामोरे जावे याबाबत करिअर सल्लागार मंगेश भणगे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनील सैंदाणे यांनी मार्गदर्शन करताना नोकरीइच्छुक उमेदवार, उद्योग आणि शासकीय महामंडळे यांना सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून रोजगार व स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणे हे या मेळाव्याचे उष्ठ असून पात्रतेप्रमाणे उपलब्ध रिक्तपदांसाठी विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देऊन उपलब्ध संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहायक संचालक राजेश मानकर यांनी सांगितले की,आपल्याला रोजगार प्राप्त झाल्यानंतर कामाच्या ठिकाणी नियम पाळणे महत्त्वाचे असते. मेहनत करून आणि आवश्यक कौशल्य प्राप्त केल्याने लहान पदांवरून मोठ्या पदावर प्रगती होते. यामुळे प्रथम मिळेल ती नोकरी करावी आणि पुढे जात राहावे. यावेळी व्यासपीठावर बीटीआरआयचे उपप्राचार्य एस. एस. भामरे, धुळे आयटीआयचे प्राचार्य एम. के. पाटील उपस्थित होते. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक संचालक संपत चाटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रजनी वाघ यांनी केले. संदीप गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी आयटीआयचे प्रशांत बडगुजर, एस. यू. काळे, शंकर जाधव, अख्तर तडवी, अशोक चव्हाण, बाळू जाधव, रमाकांत कमानकर, मीनाक्षी वाघमारे, दर्शना धर्माधिकारी, नारायण थेटे, रावसाहेब गावित, प्रदीप गावित, सागर भाबड, मीना म्हस्के, महेंद्र महाले, कल्पना दवंगे, विजय चौधरी, राजू मोरे, सुभाष मोरे, कैलास गायधनी आदी उपस्थित होते.या उद्योगांनी नोंदविला सहभागया रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील ग्लॅक्सो स्मिथकेलाइन, आर्ट रबर, इपीसी इंडस्ट्रीज, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, राइटर सेफ गार्ड, डब्ल्यूएनएस ग्लोबल सवर््िहसेस, रेणुकामाता मल्टिस्टेट को-आॅप. अर्बन क्र ेडिट सोसायटी, सी.टी.आर. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, इंडोलाइन इंडस्ट्रिज, डेटामॅटिक्स् ग्लोबल सर्व्हिसेस, युरेका फोर्ब्स, क्लासपॅक, मुंगी इंजिनिअर्स, डिजी डाटा सोल्यूशन, बंडल टेक्नॉलॉजिस, धुमाळ पोल्ट्री इक्युपमेंट,अॅपेक्स प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, युवाशक्ती फाउंडेशन, केजीपी अॅटो, एंटरमॉन्ड पॉलिकेटर्स, व्हर्गो बीपीओनिर्मिती प्रिसिजन आदी उद्योगांनी सहभाग नोंदविला.
रोजगार मेळाव्यात ४८३ उमेदवारांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 1:16 AM