सिन्नर : पुणे प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने राज्यभरातील शिक्षकांसाठी घेतलेल्या राज्यस्तरीय व नवोपक्रम स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये तालुक्यातील आगासखिंड येथील माध्यमिक शिक्षक गटातून अर्चना आरोटे यांच्या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेतून निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट उपक्रमांंची राज्यात निवड होते. यातील दहा उपक्रमांची निवड राज्यस्तरावर केली जाते. या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा निकाल पुणे विद्या प्राधिकरणामार्फत जाहीर करण्यात आला. माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटात लहवित जनता विद्यालयातील उपशिक्षिका अर्चना आरोटे यांच्या फ्लिपबुक व डिजिटल डिक्शनरी ठेवण्यात आली हाती. ''विज्ञानाची गेली भीती'' या उपक्रमास राज्यात आठवा क्रमांक प्राप्त झाला आहे. डायटचे अधिव्याख्याता डॉ. बाबासाहेब बडे, डॉ. चंद्रकांत साळुंखे, डॉ. जगन्नाथ दरंदळे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
अर्चना आरोटे यांच्या नवोपक्रमाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:16 AM