नाशिक : येथील आर्कीटेक्ट आणि नेपथ्यकार, दिग्दर्शक , लेखक विजय पवार लिखित ‘शून्य’ आणि ‘झिरो’ या दोन लघुपटांची आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे.शून्य या लघुपटाची सिने ला पेरेला, ग्वायाक्युल, दक्षिण अमेरिका, फस्ट टाइम्स फिल्मस््, इंग्लंड आणि दि लिप्ट आँफ सेशन, इंग्लंड तसेच, ‘झिरो’ या लघुपटाची दि लिप्ट आँफ सेशन, इंग्लंड या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातून आलेल्या लघुपटांमधून निवडलेल्या १२४ लघुपटात निवड झाली. शून्य अणि झिरो हे दोन्ही लघुपट कोरोनामधील लॉकडाऊन काळातील अस्वस्थतेची आणि अगतिकतेची गोष्ट आहे.लॉकडाऊन मध्ये अनुभवलेली कोरोनाची भीती, दहशत आणि जगण्याची तीव्र ओढ, अस्वस्थता यातून जेव्हा सगळे व्यर्थ वाटू लागले, शून्य झाले. त्या शून्य अवस्थेतच महाराष्ट्राच्या , भारताच्या विविध भागात घरीच अडकून पडलेल्या मित्र- मैत्रीणींसोबत इंटरनेटवरच देवाणघेवाण करत हे लघुपट बनवून सर्वच कलाकारांनी आपल्यातल्या अस्वस्थतेला सकारात्मक दिशा दिली आहे. यातून समाजप्रबोधनाचा एक वेगळा प्रयत्न केला गेला. त्या प्रयत्नांची दखल या चित्रपट महोत्सवांच्या रु पाने घेतली गेल्याने सर्व कलावंतांनी आनंद व्यक्त केला.