गेल्या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वात सर्वाधिक सात जागा मिळवत सत्ता मिळवली होती, तर राष्ट्रवादीने काँग्रेसशी आघाडी करत तीन जागा मिळवल्या होत्या. शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत शिवसेनेला दोन व भाजप व मनसेला प्रत्येकी एक तर तीन अपक्ष उमेदवार निवडून आले होते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे मोठे पानिपत करत शिवसेनेने चार जागा, तर काँग्रेसने २ जागा मिळवल्या होत्या. पंचायत समितीतही शिवसेना व काँग्रेसचे प्राबल्य राहत राष्ट्रवादीला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. माजी आमदार रामदास चारोस्कर हे आता शिवसेनेत असल्याने शिवसेनेची ताकत वाढत काँग्रेसला त्याचा फटका बसणार आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी-शिवसेना सरळ लढती झाल्या असून त्यात एक वेळा सेनेने, तर राष्ट्रवादीने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. दरम्यान, राज्यात आघाडी सरकार स्थापन होताच झालेल्या खेडगाव जि.प. गट पोटनिवडणुकीत राजकीय रंग बघायला मिळाले होते. वरिष्ठ पातळीवर महाआघाडी होत शिवसेनेने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांविरोधात राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. या निवडणुकीच्या प्रचारापासून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते दूर राहिले. मात्र, अपक्ष भास्कर भगरे निवडून आले. आता पुन्हा वरिष्ठ पातळीवर आघाडीचे वारे वाहत असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र या वाऱ्याची दिशा बदलण्याच्या दृष्टीने राजकीय पावले पडताना दिसत आहेत. दिंडोरी तालुक्यात आज राष्ट्रवादीप्रमाणेच शिवसेना प्रबळ असून जि.प. नगरपंचायत सध्याचे बलाबल पाहता शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत आहे. दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आघाडीविरोधात राष्ट्रवादी व भाजप लढत देण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेस-शिवसेना व राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरून आघाडी झाली तरी स्थानिक पातळीवर ती कितपत रुचेल, हे सांगणे अवघड आहे.
इन्फो
खेडगाव पॅटर्न पुन्हा चर्चेत
वरिष्ठ पातळीवरून आघाडी झाली तरी स्थानिक पातळीवर पुन्हा खेडगाव जि.प. पोटनिवडणूक पॅटर्न उदयास येण्याची शक्यता दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. मतदारसंघात विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमात श्रेयवाद रंगू लागला असून बॅनरवर नेत्यांचे एकत्र फोटो, पण प्रत्यक्ष कार्यक्रमात शिवसेना, राष्ट्रवादी अंतर ठेवून राहत आहे. शिवसेनेने जनतादरबार व संपर्क अभियानांतर्गत निवडणुकांची तयारी सुरू केली असून राष्ट्रवादीतर्फे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे मतदारसंघात दौरे सुरू झाले आहेत. भाजपचीही निवडणुकीची तयारी सुरू झाली असून राज्यातील आघाडी शासनाविरोधात आंदोलने करत वातावरण तापवले जात आहे. काँग्रेस, माकप व मनसेही तयारी करत आहे.
फोटो-----
दिंडोरी नगरपंचायतीचा फाेटो वापरावा.