शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

बचतगटातर्फे दारूबंदीचा ठराव संमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 9:37 PM

पेठ : व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेली तरुण पिढी आणि सामान्य कुटुंबांची होणारी नासाडी यावर उपाययोजना करण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेत महिला बचतगटाच्या माध्यमातून दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे.

पेठ : व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेली तरुण पिढी आणि सामान्य कुटुंबांची होणारी नासाडी यावर उपाययोजना करण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेत महिला बचतगटाच्या माध्यमातून दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे. पेठ तालुक्यातील खिरकडे येथील महिला पोलीसपाटील अश्विनी नाठे यांच्या संकल्पनेतून मैत्री सेवा महिला बचतगटाच्या सदस्यांनी गावात बैठक घेऊन दारूबंदीबाबत ठराव संमत केला.ग्रामीण भागात व्यसनाचे प्रमाण वाढल्याने संसाराची दुर्दशा झाल्याच्या अनेक घटना घडत असून, यातून तरुण पिढीला सावरण्यासाठी गावात दारू तयार करणे अथवा पिण्यास पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच सध्या कोरोना संसर्गामुळे नागरिकांनी विनाकारण गावाबाहेर न जाता शासकीय नियमांचे पालन करून स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. दारूबंदीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीतही सर्व महिला सदस्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर केला. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, महिला बचतगटाच्या अध्यक्ष व महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या.

टॅग्स :Nashikनाशिक