नाशिक : घरच्या जबाबदाऱ्यांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे प्रत्येक महिलेला नोकरी, व्यवसायासाठी बाहेर पडता येत नाही. अशा महिला बचतगटाच्या माध्यमातून दरमहा आर्थिक बचत करतात. कर्ज देऊन आपापल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. लहान-मोठ्या वस्तू, पदार्थ तयार करून त्या विकण्याचा प्रयत्न करतात. या बचतगटांना महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागांतर्गत रोजगाराच्या संधी, प्रशिक्षणाची अपेक्षा आहे. याशिवाय त्यांनी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी जागेचा प्रश्नही भेडसावतो आहे. वर्षभरात कशा प्रकारच्या वस्तू तयार कराव्यात, त्यांची विक्री करण्यासाठी काय योजना आखाव्यात हा प्रश्नही त्यांना सतावतो आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
बचतगटांना हवे कायमस्वरूपी मार्केट
By admin | Published: February 09, 2017 12:35 AM