लोहोणेर : - येथे महाराष्ट्र महिला जीवोन्नती अभियान अंतर्गत गावातील महिला बचतगटांना पाच दिवसांचे ग्रामसंघ बांधणी प्रशिक्षण समारोप कार्यक्र मप्रसंगी महिला सभा घेण्यात आली. या शिबिरातील उपस्थित महिलांना प्रधानमंञी श्रमयोगी मानधन योजनेचे नोंदणी करूनच कार्ड वाटप करून शुभारंभ करण्यात आला. उंचभरारी ग्रामसंघाच्या माध्यमातुन स्वंय सहायत्ता समुहांना व्यवसायासाठी बँककडुन होणारा कर्जपुरवठा ,गटाच्या दशसुत्रीच्या नियमांचे पालन , ग्रामसंघाच्या भुमिका व जबाबदाऱ्या , अजेंडा ,पदधिकारी तसेच ग्रामसंघ बांधणीवर पाच दिवस गावातील तेवीस बचतगटातील दोनशे पन्नास महिला उपस्थित होते. यावेळी ग्रामसंघ तयार करण्यात आला. त्यांना प्रशिक्षण वर्धा जिल्ह्यातुन आलेल्या वर्धिनी कविता शंकदरवार , माधुरी जीवने, स्मिता बहादुरे तसेच देवळा तालुका समन्वयक मनोज साळी यांनी दिले . पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेविषयी गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनश्री अहेर , पंचायत समिती सदस्य कल्पना देशमुख , सरपंच जयवंता बच्छाव , गटविकास अधिकारी महेश पाटील ,विस्तारअधिकारी रघुनाथ सुर्यवंशी ,भैय्यासाहेब सावंत उपस्थित होते.
लोहोणेर येथे बचतगटांचे प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 2:38 PM