शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

शेतकऱ्यांसाठी स्वयंआर्थिक विकास आराखडा

By admin | Published: July 08, 2017 12:04 AM

नाशिक : विभागात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आराखडा आखण्यात येणार असल्याची माहिती महसूल आयुक्त महेश झगडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक विभागात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्वयंआर्थिक विकास आराखडा आखण्यात येणार असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे वेगवेगळी कारणे असून, अशा कारणांच्या मुळाशी जाऊन त्यावर सर्वांगीण विचार व्हावा, तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी या आराखड्याच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करणे शक्य होऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी शुक्रवारी (दि. ७) सिनिअर जर्नलिस्ट फोरमसोबत शासकीय विश्रामगृहात संवाद साधला. यावेळी संपूर्ण देशभरात सध्या ऐरणीवर असलेल्या शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना झगडे म्हणाले, विभागीय स्तरावर सर्व जिल्ह्णांतील गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक व तहसीलदार यांच्या माध्यमातून गावसल्लागार नेमण्यात येणार असून, त्यांच्यावर गावातील तणावग्रस्त कुटुंबांचे निरीक्षण करून त्यांच्या समुपदेशानाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप होते, परंतु जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर विकासदर अथवा एकूण उत्पन्न ठरविण्याची यंत्रणा नाही. अशी यंत्रणाही विकसित होण्याची गरज आहे. तसेच वेगवेगळ्या हंगामात उत्पादित होणारा माल व त्यासाठी बाजारपेठ याविषयाचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. उत्पादित मालाचा आढावा घेण्यासोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा आढावा घेऊन शेतमाल उत्पादनाची दिशा ठरविण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन प्राप्त झाल्यास शेतकरीवर्गाच्या नियमित वार्षिक उत्पन्नात वाढ घडवून आणणे शक्य आहे, असा विश्वास व्यक्त करतानाच कृषी विद्यापीठांचे कृषिबाजार विद्यापीठांमध्ये रूपांतर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. झगडे यांनी फोरमच्या सदस्यांसोबत विभागातील विविध भागांतील घडामोडींविषयी माहिती मिळवितानाच समृद्धी महामार्ग, नाशिक-पेठ-सुरत महामार्ग, रोजगार, एनए जमिनींचे परवाने, अवयवदान चळवळ, गोदावरी प्रदूषण, गुटखा बंदी, प्रशासकीय यंत्रणा आदी वेगेवेगळ्या विषयांवर दिलखुलास संवाद साधला.