नाशिक : शिवजयंतीनिमित्त रामशेज किल्लयावर पोहचलेल्या दुर्गप्रेमींपैकी काहींनी उत्साहात ‘सेल्फी’ काढण्याचा प्रयत्न येथे केला. यावेळी लोंबकळणाऱ्या झाडाच्या फांदीवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याचा अंदाज त्यांना आला नाही व त्या फांदीला या ‘सेल्फी ग्रूप’चा धक्का लागला. त्यामुळे मधमाशांचा मोहोळ उठला. मधमाशांनी येथे उपस्थित असलेल्या सर्वांवर हल्ला चढविला. यामुळे पर्यटकांना पळता भुई थोडी झाली. सदर वार्ता किल्ल्यालगतच्या आशेवाडी गावात पसरल्यानंतर गावकऱ्यांनी किल्ल्याच्या दिशेने धाव घेतली. यावेळी गावकऱ्यांनी किल्ल्यावर असलेल्या पर्यटकांवर टॉवेल, चादरी टाकून त्यांना सुखरुपपणे गावात आणले. दरम्यान, मधमाशांची संख्या प्रचंड असल्याने व त्या आक्रमक झाल्याने पर्यटकांना चावा घेतला. यामुळे अनेकांचे चेहरे, हात, पाय सुजले. घटनेची माहिती ‘१०८’च्या केंद्राला देण्यात आली. त्यानंतर तेथे रुग्णवाहिका दाखल झाल्या.नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामधील आशेवाडी गावात समुद्रसपाटीपासून ९८५ मीटर (३२३० फूट) उंचीवर ‘रामशेज’ हा ऐतिहासिक किल्ला आहे. नाशिकपासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर आहे. प्रभू रामचंद्र या किल्ल्यावर विश्रांतीला जात होते तेथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडल्याचे बोलले जाते. या किल्लयाचे वैशिष्ट म्हणजे हा जंगलात किंवा डोंगरात वसलेला नसून मोकळ्या जागेत आहे.---‘रामशेज’चा इतिहास दृष्टीक्षेपातरामशेज हा लहान असला तरी इतिहासात त्याची ख्याती मोठी आहे. १६३५ सालात शहाजहांन जेव्हा दख्खन प्रांत ताब्यात घेण्यासाठी आला तेव्हा त्याने सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे रामशेज. त्यानंतर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६८२ सालात मुघलांनी हा गड जिंकण्यासाठी प्रयत्न करत संभाजी राजांच्या अधिपत्याखाली असलेल्या या किल्ल्याला औरंगजेबच्या विविध मुघल सरदारांनी अनेकदा वेढा घालून गड ताब्यात घेण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. औरंगजेबाचा सरदार शहाबुद्दीन हजारोंची फौज व तोफांचा लवाजमा घेऊन किल्ला जिंक ण्यासाठी आला. त्यावेळी किल्ल्यावर फक्त ६०० मावळे होते. सूर्याजी जेधे नावाचे किल्लेदाराच्या नेतृत्वाखाली हे मावळे ‘रामशेज’चे संरक्षण करत होते. ते धाडसी व पराक्र मी होते. त्यावेळी किल्ल्यावर तोफा नव्हत्या. संभाजी राजांनी स्वत: लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारु गोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आण िमावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या. आण िकिल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. या आक्र मणाने खानला काही सुचेनासे झाले. जवळपास पाच महिने झाले तरीदेखील हा किल्ला तो जिंकू शकला नाही. तब्बल सहा वर्षांनी १६८७ मध्ये मुघलांनी हा किल्ला ताब्यात घेतला. इसवीसन १७०७मध्ये पुन्हा मराठी स्वराज्यात रामशेज समाविष्ट झाला आणि १८१८मध्ये अन्य किल्लयांसमवेत रामशेज देखील इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला.
‘सेल्फी’ भोवली : मधमाशांच्या पोळ्याला धक्का; ‘रामशेज’वर धावपळ
By admin | Published: February 19, 2017 3:40 PM