पाटोदा :- येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु आहे. सतत बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष मण्यात साखर उतरण्यास उशीर होत असल्याने द्राक्षाची गोडी कमी झाली आहे .त्यामुळे द्राक्ष बागा खरेदीकडे व्यापारी वर्गाने पाठ फिरवल्यामुळे उत्पादक शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले असून तो धास्तावला आहे. गोडी कमी असल्यामुळे तसेच रंगहीन द्राक्षामुळे दर उतरले असल्याने केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटा होत असल्याने शेतकरी वर्गाची आर्थिक कोंडी झाली आहे.सकाळी हवेत गारवा ,दिवसभर ऊन व ढगाळ पावसाळी हवामान ,रात्री कडाक्याची थंडी तर पहाटे थंडी , धुके व प्रचंड दव आशा सततच्या विचित्र वातावरणाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे.त्यामुळे द्राक्ष मण्यात साखर उतरण्यास विलंब होत असून बागेवर भुरी,मिलीबग,लालकोळी या सारखे रोग बळावले असल्याने मोठया प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे. सध्या बागा खरेदीकडे व्यापारी वर्गाने पाठ फिरवली असल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे .त्यामुळे शेतकरी वर्गाने व्यापाºयांची वाट न बघता घरीच द्राक्ष बागेचा खुडा करून बाजारपेठेत पाठविण्यास सुरु वात केली आहे. आहे.मात्र तेथे वीस ते बावीस रु पये इतका अत्यल्प दर मिळत असल्याने द्राक्षाची गोडी बेचव झाली असून त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
वातावरणातील बदलामुळे द्राक्षाची गोडी झाली बेचव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 12:38 PM