वडाळ्यातून थेट मध्यप्रदेशला विक्री; मामीने नवविवाहिता भाचीचा केला सौदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 03:51 PM2019-06-23T15:51:29+5:302019-06-23T16:02:51+5:30

पीडितेला येथील एका खोलीत या दोघा संशयितांनी नेले आणि ‘तुला राजस्थानमध्ये दुसरे लग्न करावे लागेल, अन्यथा जिवे ठार मारू’ अशी धमकी देत मारहाण केली. रात्री याच खोलीत संशयित चेत्याने विवाहितेला आपल्या वासनेचा बळी बनविल्याचे फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे.

Selling directly from Vadodara to Madhya Pradesh; Mummy married a newly married woman | वडाळ्यातून थेट मध्यप्रदेशला विक्री; मामीने नवविवाहिता भाचीचा केला सौदा

वडाळ्यातून थेट मध्यप्रदेशला विक्री; मामीने नवविवाहिता भाचीचा केला सौदा

Next
ठळक मुद्देसंशयित हेमंत व चेत्या ऊर्फ शाहरूख या दोघांनी मिळून बलात्कार केलासंशयित ग्राहक हेमंत धाकड याला दीड लाखात विक्री पोलिसांनी मामीला अटक केली

नाशिक : एका नवविवाहितेची तिच्या मामीने फसवणूक करत अजमेरला दर्ग्यावर दर्शनासाठी जाण्याचा बहाणा करून एका राणी ऊर्फ परवीन नावाच्या महिलेशी संगनमताने नवविवाहित युवतीला थेट मध्यप्रदेशमधील दलौदा येथील संशयित आरोपी ग्राहक हेमंत धाकड याला दीड लाखात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयित हेमंत व दलाल चेत्या ऊर्फ शाहरूख या दोघांनी मिळून पीडित युवतीला एका खोलीत डांबून मध्यप्रदेशच्या जावरा, बडवन येथे बलात्कार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वडाळागावातील महेबूबनगरमध्ये राहणाऱ्या एका युवतीचा २२ मार्च २०१९ रोजी राजस्थानमधील सिरोई जिल्ह्यातील एका युवकासोबत रीतसर विवाह झाला होता. विवाहानंतर रमजान पर्व सुरू झाले, त्यामुळे नवविवाहितेला आई व भाऊ माहेरी घेऊन आले. वडाळ्यात राहणा-या मामीच्या घरी पीडित नवविवाहिता ६ मे २०१९ रोजी भेटण्यासाठी गेली. त्यावेळी तिच्या घरात संशयित आरोपी महिला परवीन ऊर्फ राणी, शाहरूख ऊर्फ चेत्या हे बसलेले होते. दरम्यान, अजमेरला दर्ग्यावर दर्शनासाठी जाऊ, असे मामीने पीडितेला सांगून विश्वास संपादन केला. ‘तुझा नवरा अजमेरला आलेला आहे. तू राणी व चेत्यासोबत दर्शनासाठी निघून जा आणि तेथून राजस्थानला नव-यासोबत तुझ्या सासरी जा, माझे तुझे मामा व आईसोबत बोलणे झाले आहे’ असे मामीने पीडितेला खोटे सांगितले. त्यानंतर चेत्या, राणी व जहीर शहा या तिघांनी रिक्षामधून द्वारका येथे पीडितेला नेले. ७ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चेत्या आणि राणी या दोघांनी एका खासगी लक्झरी बसमध्ये पीडितेला बसवून थेट मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील जावरा तालुक्यात उतरविले. तेथे राणीने ‘येथे माझी बहीण राहते, तिला अजमेरला घेऊन जायचे आहे,’ असे सांगितले. त्यानंतर पीडितेला येथील एका खोलीत या दोघा संशयितांनी नेले आणि ‘तुला राजस्थानमध्ये दुसरे लग्न करावे लागेल, अन्यथा जिवे ठार मारू’ अशी धमकी देत मारहाण केली. रात्री याच खोलीत संशयित चेत्याने विवाहितेला आपल्या वासनेचा बळी बनविल्याचे फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पीडितेने पोहोचून संशयितांविरुद्ध फिर्याद दिली आहे. संशयित चेत्या ऊर्फ शाहरूख, पीडितेची खरेदी करणारा संशयित हेमंत, परवीन ऊर्फ राणी, पीडितेची मामी या चौघांविरुद्ध अनुक्रमे बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मामीला अटक केली असून उर्वरित फरार संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Selling directly from Vadodara to Madhya Pradesh; Mummy married a newly married woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.