पिंपळगाव बसवंत : येथील जोपुळ रोड वरील बाजार समिती परिसरात अनेक ढाबे असुन सध्या टोमॅटो हंगाम असल्यामुळे या ठिकाणी हजारो मजुर काम करत असल्याने या ढाब्यावर सर्रासपणे दारू विक्र ी होत आहे. मात्र जी दारू विक्र ी होते ती दारू बनावट असल्यामुळे बरेच मजुर आजारी पडत आहेत. यातच मंगळवारी (दि.९) गणेश नामक एका ३५ वर्षीय मजुराचा तो दारुच्या नशेत असताना बाजार समितीच्या समोरील ढाब्यासमोरच अज्ञान वाहकाच्या धडकेने त्याचा जागीच मृत्यु झाला. हे प्रकार वाढण्याच्या आधीच या ढाब्यावर पोलीसी कारवाईची मागणी होत आहे. बाजार समिती परीसरात राजरोस पणे बनावट व अवैध दारू विक्र ी होते, अशी वारंवार ओरड होत आहे. मात्र त्याबद्दल पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून पिंपळगाव बाजार समितीचा नावलौकीक आहे. याच बाजार समितीच्या आसपासच्या असलेल्या ढाब्यावर मोठ्या प्रमाणात दारूची विक्र ी होत असल्याचे रीकाम्या बाटल्या गोळा करणाऱ्या भंगार व्यावसायिकाने बोलुन दाखवले.पोलीस गाडी येण्या आधीच काही मिनीटे ही बानावट आणि अवैध दारू विक्री बंद होते. आणि पोलिसांचे वाहन गेल्यावर पुन्हा सेवा चालु होते. असे प्रकार ग्रामस्थांनाही माहितीचे झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
बाजार समिती परीसरात अवैध दारूची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 6:09 PM
पिंपळगाव बसवंत : येथील जोपुळ रोड वरील बाजार समिती परिसरात अनेक ढाबे असुन सध्या टोमॅटो हंगाम असल्यामुळे या ठिकाणी हजारो मजुर काम करत असल्याने या ढाब्यावर सर्रासपणे दारू विक्र ी होत आहे. मात्र जी दारू विक्र ी होते ती दारू बनावट असल्यामुळे बरेच मजुर आजारी पडत आहेत. यातच मंगळवारी (दि.९) गणेश नामक एका ३५ वर्षीय मजुराचा तो दारुच्या नशेत असताना बाजार समितीच्या समोरील ढाब्यासमोरच अज्ञान वाहकाच्या धडकेने त्याचा जागीच मृत्यु झाला.
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : वाहनाच्या घडकेने मद्यपीचा मृत्यु