शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सेमिक्रिटकल झोन : चांदवड तालुक्यातील ३६ गावांतील विहिरींची पातळी खोल विहीर योजनेपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 12:42 AM

दरेगाव : भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने सर्व्हे करून जिल्ह्यातील सेमिक्रिटिकल, क्रिटिकल व ओव्हर एक्सप्लॉयटेड क्षेत्रामध्ये नवीन विहीर घेण्यात येऊ नये याबाबत बंदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे नवीन विहीर खोदण्याचा मार्ग बंद झालाआर्थिकदृष्ट्या असक्षम शेतकऱ्यांवर मात्र अन्याय

दरेगाव : भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने सर्व्हे करून जिल्ह्यातील सेमिक्रिटिकल, क्रिटिकल व ओव्हर एक्सप्लॉयटेड क्षेत्रामध्ये नवीन विहीर घेण्यात येऊ नये याबाबत बंदी करण्यात आली आहे. त्यात चांदवड तालुक्यातील ३६ गावे सेमिक्रिटिकल झोनमध्ये येतात.चांदवड तालुक्यातील अनेक गावांची भूजलपातळी अत्यंत खालावली आहे. त्यासाठी पाण्याचा अतिउपसा कारणीभूत आहे. त्यामुळे या गावांमध्ये शासकीय योजनेतून नवीन विहीर खोदण्याचा मार्ग बंद झाला. पाण्याचा अतिउपसा होऊ नये म्हणून सदर निर्णय योग्य वाटत असला तरी त्यामुळे अनेक आर्थिकदृष्ट्या असक्षम शेतकऱ्यांवर मात्र अन्याय होणार आहे. यासाठी विहीर पुनर्भरण सक्तीचे करणे आवश्यक आहे. या गावांमधील बहुतांश गावांमध्ये शेतीच्या सिंचनासाठी पिके घेण्यासाठी विहिरी व्यतिरीक्त अन्य व्यवस्था कमी आहे. पाटाच्या पाण्याची सोय नाही. पर्जन्यमान कमी असते. वर्षातून एकच पीक निघते व त्यातही पाणी देण्याची सोय नसल्यास केवळ पावसाच्या पाण्यावर पिके जगवायची कशी यासारख्या विवंचनेत विशेषत: अनु. जाती व जमातीचे शेतकरी आहेत. शेततळ्यात पाणी साठवण करणे महागड्या खर्चामुळे गरीब शेतकºयांच्या आवाक्याबाहेरचे आहे.सदर बंदीचा फटका फक्त गरीब शेतकºयांना बसणार असून आर्थिकदृष्ट्या संपन्न शेतकºयांकडे पाणी उपशासाठीच्या विहिरी, विंधन विहिरी, शेततळे यासारखी साधने असल्याने त्यांना मात्र समस्या निर्माण होत नाही.त्यामुळे ही बंदी उठविण्याची मागणी होत आहे. चांदवड तालुक्यातील उसवाड, डोंगरगाव, दुगाव, कोकणखेडे, पिंपळगाव धाबळी, रायपूर भडाणे, वाद, वराडी, कानडगाव, कुंदलगाव, निमोण, दरेगाव, भोयेगाव, मेसनखेडे बुद्रुक, मेसनखेडे खुर्द, डोणगाव, शिंगवे, दहेगाव (मनमाड), वागदर्डी, रापली, वडगावपंगु, कातरवाडी, राजदेरवाडी, नांदुरटेक, वडबारे, इंद्रायवाडी, राहुड, हट्टी, जैतापूर, एकरुखे, जांबुटके, पिंपळनारे, वडनैरभैरव, खडकजांब, धोतरखेडे, ही गावे सेमिक्रि टिकल वाटर शेडमध्ये येतात. यापूर्वीही चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील २२ गावे डार्क वॉटर शेडमध्ये होती; मात्र आठ वर्षांपूर्वी या गावातील विहिरींवरील बंदी शासनाने उठविली होती. त्याचप्रमाणे आताही शासनाने सदर बंदी उठविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वीची जवाहर रोजगार योजना गेल्या अनेक वर्षापासून लक्षांकाअभावी बंद असून ही योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.