राष्ट्रीय चर्चासत्रात ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. उमेश बगाडे, अन्वर राजन, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. यशदत्त अलोने यांच्यासह सोनिपत, हरयाणा येथील भगत फूलसिंग महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सुषमा यादव आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सर्वांत मोठा शेतकरी मोर्चा काढणारे डॉ. आंबेडकर, जलसिंचन, ऊर्जानिर्मिती, विमाक्षेत्र, कृषिक्षेत्र, चलनव्यवस्था व बँकिंग या क्षेत्रातील डॉ. आंबेडकर यांच्या कार्यावर चर्चा व्हावी, त्यांचे दुर्लक्षित पैलू समोर यावेत, या हेतूने ‘कलासक्त बाबासाहेब’, ‘बाबासाहेबांचा खोतीविरोधी शेतकरी लढा’, ‘दलितेतरांनी पाहिलेले बाबासाहेब’, ‘जागतिक पातळीवरील मानवीहक्क चळवळीबाबतचे बाबासाहेबांचे विचार’, ‘बाबासाहेबांना प्रभावित करणाऱ्या व्यक्ती, विचार, घटना आणि बाबासाहेबांचा उल्लेखनीय चळवळी, घटना व व्यक्तींवरील प्रभाव’ यासारख्या विविध विषयांवर या चर्चासत्रात चर्चा रंगणार आहे. श्रोत्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून या चर्चासत्रात सहभागी होता येणार आहे.
मुक्त विद्यापीठात आंबेडकर जयंतीनिमित्त चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:14 AM