दिंडोरी : दिंडोरी व पेठ तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने पाठिंबा दर्शविण्यात आला.दिंडोरी व पेठ तालुक्यात भात, नागली, मका, कुळीद, उडीद, सोयाबीन, टोमॅटो या प्रमुख पिके शेतातच करपून गेले असून नुकसानग्रस्त भागाचा धनराज महाले,जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावित, सदू गावीत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांनी पाहणी करून हे दोन्ही तालुके दुष्काळी म्हणून समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी केली होती.पंरतु कुठल्याही प्रकारे दखल घेतली नसून, दिंडोरी तालुक्यातील सहा मंडळापैकी दिंडोरी, मोहाडी व वरखेडा केवळ तीन मंडळ दुष्काळी जाहीर केले आहे.तालुक्याच्या पश्चिम भागाचा देखील दुष्काळी जाहीर करावे अशी मागणी तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गुरूवारी शिवसेनेच्यावतीने दिंडोरी तहसील कार्यालयाच्याबाहेर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यावेळी तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी सहकार नेते सुरेश डोखळे, विश्वास देशमुख, जयराम डोखळे, माजी जि.प.सदस्य प्रवीण जाधव, सदाशिव गावीत, पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे, उपसभापती उत्तम जाधव,जिल्हा परिषद सदस्य सारिका नेहरे, रोहिणी गावीत, उपजिल्हा प्रमुख अरूण वाळके, माजी सभापती एकनाथ गायकवाड, पंचायत समिती सदस्य बेबीताई सोळसे , ज्येष्ठ नेते विश्वास देशमुख, पांडूरंग गणोरे, तालूका प्रमुख सतिश देशमुख,महिला आघाडी अध्यक्षा अस्मिता जोंधळे, शहराध्यक्ष विमल वाघ , मंदाकिणी धाञक ,सुनिल जाधव,गणेश जाधव उपस्थित होते.