शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

ज्येष्ठ वकिलांच्या प्रतिमा प्रेरणा देतील

By admin | Published: October 02, 2015 10:40 PM

पुखराज बोरा : बार सदस्यांच्या प्रतिमांचे अनावरण

नाशिक : आयुष्यातील निम्म्यापेक्षा अधिक काळ वकिली व्यवसायात घालवून पक्षकारांना न्याय मिळवून देणाऱ्या दिवंगत ज्येष्ठ वकिलांच्या प्रतिमा वकिली व्यवसायात उतरू पाहणाऱ्या नवीन वकिलांना प्रेरणादायी ठरतील, असे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुखराज बोरा यांनी काढले. नाशिक बार असोसिएशनतर्फे अ‍ॅड. रघुनाथ वाघ, नानासाहेब लेले, एम. आर. साठे व मधुकर तोष्णीवाल या चार दिवंगत ज्येष्ठ वकिलांच्या प्रतिमा न्यायालयातील ग्रंथालयात लावण्यात येणार आहे, त्या प्रतिमांचा अनावरण समारंभ शंकराचार्य संकुल येथे झाला, त्यावेळी न्यायमूर्ती बोरा बोलत होते. नाशिक न्यायालयात काही वर्षे मुख्य न्यायधीशपदी काम करताना दिवंगत सर्वच ज्येष्ठ वकिलांसोबत काम करण्याचा अनुभव आपल्याला मिळाला. त्यांच्यातील सचोटी, अभ्यासूपणा व कायद्याचे ज्ञान पाहता, पुढच्या पिढीसाठी त्यांच्या प्रतिमा नेहमीच प्रेरणा देत राहतील असा आपल्याला विश्वास वाटतो, असेही ते म्हणाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष हर्षद निंबाळकर, माजी अध्यक्ष जयंत जायभावे, अविनाश भिडे, बार कौन्सिल इंडियाचे सदस्य सुभाष देशमुख, जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना निंबाळकर यांनी, नाशिक बार कौन्सिलने दिवंगत ज्येष्ठ वकिलांच्या प्रतिमांच्या रूपाने त्यांचे कार्य सतत स्मरणात राहण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक बारचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी केले, तर कार्यक्रमाची माहिती जयंत जायभावे यांनी दिली. कार्यक्रमास सर्व वकील वर्ग, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)