दिंडोरी : शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पालखेड रस्त्याच्या दुरवस्थेला बांधकाम विभागाने दिलेल्या माती-मुरमाच्या मुलाम्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांसह या भागातील रहिवाशांना श्वसनाला त्रास होत आहे. बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत येथील ज्येष्ठ नागरिक संघाने मास्कचे वाटप करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या गांधीगिरी आंदोलनाने तरी प्रशासन जागे होऊन रस्त्याचे नूतनीकरण करणार का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.पालखेड रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून, मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सदर रस्ता रहदारीचा असून, एमआयडीसीत येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची वाट लागली आहे. बांधकाम विभागाने रस्त्यावर माती-मुरुम टाकून वेळ मारून नेली. मात्र त्यामुळे प्रचंड धूळ उडत आहे. या धुळीचा त्रास रहिवाशांसह पादचारी व वाहनधारक होत आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दिंडोरी तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने नागरिकांना मास्कचे वाटप करून गांधीगिरी करण्यात येऊन तहसीलदार कैलास पवार यांना संघटनेचे तालुकाध्यक्ष एकनाथ दौंड यांच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष संतू मोरे, त्र्यंबक बस्ते, सचिव शांताराम पाटील, प्रमोद पाटील, किसन सातपुते, शंकर राजदेव, बाळ राजे, इलियास सय्यद, अण्णासाहेब कदम, गोपीनाथ घुमरे, दगू सोनवणे, भिका कावळे, दौलतराव दगू बोरस्ते, संपतराव मुरकुटे, अॅड. फराद पठाण, भास्कर वडजे, यमुनाबाई पाटील, गीताबाई पाटील, राजाराम पाताडे, रामराव क्षीरसागर, भिका ढाकणे, रामकृष्ण वडजे, सुरेश वाघ, पुंडलिक ढगे, शशिकांत वाघ आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते रणजित देशमुख यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग घेतला.धुळीपासून संरक्षण होण्यासाठी पालखेड रस्त्यावरील नागरिकांना ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मास्कचे वाटप करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभाग व दिंडोरी नगरपंचायत यांच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षांपासून हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
ज्येष्ठ नागरिक संघाची दिंडोरीत गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 10:27 PM
पालखेड रस्त्याच्या दुरवस्थेला बांधकाम विभागाने दिलेल्या माती-मुरमाच्या मुलाम्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांसह या भागातील रहिवाशांना श्वसनाला त्रास होत आहे. बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत येथील ज्येष्ठ नागरिक संघाने मास्कचे वाटप करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या गांधीगिरी आंदोलनाने तरी प्रशासन जागे होऊन रस्त्याचे नूतनीकरण करणार का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
ठळक मुद्देरस्त्याची दुरवस्था : मास्क लावून वेधले प्रशासनाचे लक्ष