नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची राळ संपूर्ण जिल्ह्यात उठलेली असताना नाशिकमध्ये मात्र कॉँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अद्याप कोणत्याही नेत्याने नाशिकमध्ये पाय ठेवला नसून अद्याप तसे कोणतेही नियोजन नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही उमेदवार वाºयावर असल्याचे दिसत आहे.कधीकाळी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या पक्षाची अडचण होताना दिसत आहे. पक्षाच्या वतीने राष्टÑवादी आणि मित्रपक्षांशी आघाडी करण्यात आली असून, पंधरापैकी अवघ्या पाच जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. नाशिक शहरात चार पैकी दोन जागा राष्टÑवादीला मिळाल्या असल्या तरी नाशिक पूर्वची जागा कवाडे गटाला सोडावी लागली आहे.८ आॅक्टोबर रोजी झालेल्या माघारीनंतर जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदित्य ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ, डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह अनेकांच्या सभा झाल्या आहेत. कमी जागा लढवणाºया एमआयएम आणि माकपाच्या नेत्यांनीदेखील प्रचारासाठी नाशिकमध्ये हजेरी लावली असून, सभा घेतल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांच्या सोयीने त्यांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत किंवा आगामी काळात तसे नियोजनदेखील करण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसकडून कोणत्याही नेत्याने हजेरी लावलेली नाही. दरवेळी प्रचाराच्या दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात असे अनेक नेते नाशिकमध्ये सभा घेत, मात्र यंदा अशा प्रकारची कोणतीही तयारी दिसत नाही.सोनिया गांधी यांच्या सभेची चर्चाचबहुतांश नेते आपापल्या मतदारसंघ किंवा त्या परिसरातच अडकून पडलेले दिसत आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत पक्षात जान फुंकण्यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचीच सभा नाशिकमध्ये घेण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. परंतु सोनिया गांधी यांच्या सभेचे नियोजन दूरच, प्रदेश नेतेदेखील येण्यास तयार नाहीत.या निवडणुकीत पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसहपक्षात वर्षानुवर्षे काम करणारे उमेदवार संघर्ष करीत आहेत. मात्र दुसरीकडून नेत्यांकडून रसद पुरवठा होताना दिसत नसून उमेदवारांना खºया अर्थाने स्वबळावर निवडणूक लढवावी लागत असल्याचे कार्यकर्ते म्हणत आहेत.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिककडे फिरवली पाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:59 PM
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची राळ संपूर्ण जिल्ह्यात उठलेली असताना नाशिकमध्ये मात्र कॉँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अद्याप कोणत्याही नेत्याने नाशिकमध्ये पाय ठेवला नसून अद्याप तसे कोणतेही नियोजन नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही उमेदवार वाºयावर असल्याचे दिसत आहे.
ठळक मुद्देउमेदवार वाऱ्यावर : प्रचारासाठी कोणाच्याही सभा नाहीत