उद्योजक म्हटला म्हणजे तो व्यक्ती निव्वळ व्यवहारी असावा, अशी प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. परंतु वै. नंदकुमारजी याला अपवाद ठरले. मोठमोठ्या कीर्तन महोत्सवात, धार्मिक कार्यात ते हिरिरीने सहभाग घेत. गोशाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी त्यांनी सदैव योगदान दिले आहे. गरिबीतून मार्ग काढत सचोटी, प्रामाणिकपणा हे गुण त्यांनी त्यांच्या कार्यात उतरवित ते यशस्वी उद्योजक झाले. अडचणीत, दुःखात सापडलेल्या लोकांना त्यांनी जमेल तशी मदत देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आज त्यांची मुलेही प्रवास करीत आहेत. त्यांचे निधन झाले असले तरी आठवणींच्या स्वरूपात सदैव स्मरणात राहतील. आपणही त्यांचा आदर्श घेऊन राष्ट्रासाठी प्रेरणादायी कार्य उभारूया, हीच वै. नंदकुमारजी यांना खरी आदरांजली ठरेल.
प्रकाश कोल्हे, संस्थापक अध्यक्ष,
मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक.