शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पुराचा धोका ओळखणारे सेन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 12:56 AM

सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या गर्डरला पुराचे पाणी धडकल्यानंतर लागलीच संबंधितांना सेन्सर अलर्ट करते. या यंत्रणेमुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य झाले असून, दुर्घटना रोखण्यासही मदत होणार आहे.

नाशिक : सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या गर्डरला पुराचे पाणी धडकल्यानंतर लागलीच संबंधितांना सेन्सर अलर्ट करते. या यंत्रणेमुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य झाले असून, दुर्घटना रोखण्यासही मदत होणार आहे.मागीलवर्षी महाड येथील सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यात हजारो ब्रिटिशकालीन पूल आहेत. या पुलांना पाण्याच्या प्रवाहाचा सर्वाधिक धोका असतो. सावित्री नदीवरील पुलाच्या घटनेमुळे ही बाब अधोरेखितही झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पुलाच्या सुरक्षिततेसाठी पूर पातळी वाढत असलेल्या पुलांना सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या सरफेसखाली दोन ते तीन फुटांवर असलेल्या गर्डरला सेन्सर लावले जाते. या सेन्सरपर्यंत पाण्याची पातळी किंवा पाण्याची लाट आदळल्यानंतर सेन्सरवरून तीन अभियंत्यांना एसएमएस जातो. पुराची पातळी, पाण्याचा प्रवाह यांची माहिती एसएमएसद्वारे मिळते. हा एसएमएस सातत्याने येत असतो. यंदाच्या पावसाळ्यात नांदूरमधमेश्वर येथील पुलाजवळ पाण्याची पातळी पोहोचल्यानंतर सेन्सरद्वारे अलर्ट मिळाला होता. त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षारक्षक तैनात करून वाहनांना हा पूल बंद करण्यात आला, तर पुलावर जाण्यासही मज्जाव करण्यात आला.नाशिक जिल्ह्यातील गोदावरी, गिरणा, दारणा, नार-पार, कडवा, मोसम, कश्यपी, अळवंडी या नद्यांवरील एकूण २८ पुलांवर सेन्सर बसविण्यात आले आहेत. याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीच्या माध्यमातून हे सेन्सर कार्यान्वित करण्यात आले आहेत. शंभर ते दोनशे आणि दोनशे मीटरच्या पुढील उंचीवरील पुलांवर हे सेन्सर बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील केवळ एक पूल वगळता इतर १७७ पूल पाण्यापासून सुरक्षित आहेत. या पुलांवरून पाणी वाहत नाहीत. परंतु २८ पुलांचा धोका लक्षात घेता या पुलांना पाण्याचे पिलर किंवा गर्डरला लाटांचा दबाब येऊ नये यासाठी सेन्सर बसविण्यात आले आहेत. पाणी गर्डरपर्यंत पोहोचल्यानंतर या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्याची उपाययोजना केली जाते. सेन्सरमुळे तत्काळ उपाययोजना शक्य झाली आहे. रात्री अपरात्री पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर धोका अधिक वाढतो. रात्रीच्या सुमारास पुलावरून जाणाºया वाहनांना धोक्याची कल्पना नसते. त्यामुळे हा धोका ओळखून गर्डरला पाणी लागताच तत्काळ पूल बंद करण्याची कारवाई केली जाते. यासाठी संबंधित अधिकारी ज्यांना अलर्ट आलेला असतो ते आपल्या ताफ्यासह जाऊन वाहतुकीचे नियोजन आणि गावकºयांशी चर्चा करून नियोजन करणे शक्य झाले आहे.