पंचवटी : मखमलाबाद शिवारातील चांदशीरोड परिसरात महापालिकेकडून नालेसफाई सुरू असताना मानवी हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या सफाई मोहिमेदरम्यान सपाई कामगारांना गुरुवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास ही हाडे सापडली होती. या घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी पोलिसांना दिल्याने शुक्रवारी ही घटना उघड झाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.मखमलाबाद शिवारात गुरुवारी सायंकाळी महापालिकेचे काही कर्मचारी नालेसफाईचे काम करत होते. त्याचवेळी नाल्यात चार ते पाच मानवी बरगड्या व कवटीचा काही भाग आढळून आला. ही मानवी हाडे अंदाजे दीड ते दोन वर्षांपूर्वीपासून नाल्यात पडलेली असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली. नालेसफाईदरम्यान सापडलेली मानवी हाडे तपासणीसाठी न्याय वैद्यकीय सहायक प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर त्यावरून मयत व्यक्तीचे वय व अन्य माहितीचा सुगावा लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांना नाल्यात मानवी बरगड्या आणि कवटीचा भाग आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर या घटनेची माहिती न्याय वैद्यकीय सहायक प्रयोगशाळेलाही कळविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पेठरोडवरमानवी कवटी व पायाची हाडे आढळून आली होती.
नालेसफाईत मानवी हाडे आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:29 AM
मखमलाबाद शिवारातील चांदशीरोड परिसरात महापालिकेकडून नालेसफाई सुरू असताना मानवी हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या सफाई मोहिमेदरम्यान सपाई कामगारांना गुरुवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास ही हाडे सापडली होती.
ठळक मुद्देमखमलाबाद शिवार : सांगाडा दोन वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज