नाशिक : शेतात नांगरणीवरून दोन गटांत चाडेगाव शिवारात सात वर्षांपूर्वी तुंबळ हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा खटला प्रथम वर्ग न्यायाधीश आरती शिंदे यांच्या न्यायालयात सुरू होता. दोन्ही गटांतील सात आरोपींना सहा महिन्यांची सक्तमजुरीसह आर्थिक दंडाची शिक्षा गुरुवारी (दि.९) सुनावली आहे.चाडेगावातील राम उर्फ बाळू गंगाधर सांगळे, बाळू बबन हुळहुळे यांच्यामध्ये वाद झाले होते. हुळहुळे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी राम सांगळे, श्याम उर्फ काळू गंगाधर सांगळे, श्रीधर पंडित सांगळे, शंकर गंगाधर सांगळे (सर्व रा. चाडेगाव) यांनी संगनमत करून नांगरणी करण्यास विरोध केला. त्यावरून आरोपींनी हुळहुळे यांच्या भावाच्या डोक्यात लाकडी दंडुक्याने मारहाण करून दुखापत केली होती. तसेच राम सांगळे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी कचरू बबन हुळहुळे, बाळू हुळहुळे, ज्ञानेश्वर बबन हुळहुळे (सर्व रा.चाडेगाव) यांनी ट्रॅक्टरने नांगरणी करून सांगळे यांच्या शेतामधील पाइपलाइन फोडली होती. त्यामुळे सांगळे कुटुंबीय त्यांना समजावून सांगत असताना हुळहुळे कुटुंबीयांनी लाकडी दंडुक्याने मारहाण करून दोघा सांगळे बंधूंना जखमी केलेहोते.याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सांगळे आणि हुळहुळे कुटुंबीयांनी परस्परविरोधी मारहाणीची फिर्याद दाखल केली. या गुन्ह्यांचा तपास तत्कालीन पोलीस हवालदार बी. व्ही. थेटे यांनी करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी सांगळे यांच्या वतीने सरकारी वकील म्हणून अॅड. ए. पी. बागले यांनी, तर हुळहुळे यांच्या वतीने सरकारी वकील म्हणून अॅड. एस. पी. घोडेस्वार यांनी बाजू मांडलीपाच हजारांचा दंडदोन्ही गुन्ह्यांतील आरोपींविरोधात साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावे आढळून आल्याने न्यायालयाने दोन्ही गटातील सात आरोपींंना सहा महिने सक्तमजुरी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दोन गटांत हाणामारी प्रकरणी सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:34 PM
शेतात नांगरणीवरून दोन गटांत चाडेगाव शिवारात सात वर्षांपूर्वी तुंबळ हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा खटला प्रथम वर्ग न्यायाधीश आरती शिंदे यांच्या न्यायालयात सुरू होता. दोन्ही गटांतील सात आरोपींना सहा महिन्यांची सक्तमजुरीसह आर्थिक दंडाची शिक्षा गुरुवारी (दि.९) सुनावली आहे.
ठळक मुद्देपरस्परविरोधी गुन्हा : सात सदस्य ठरले दोषी