सिताणेला आठवडे बाजार बंद
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सिताणे गावात भरणारा आठवडे बाजार गेल्या काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. गावात सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्यांची चाचणी करून घेतली जात आहे. दुकानांमध्ये गर्दी होणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
स्थलांतराचे प्रमाण कमी
तालुक्यातील १४ गावांमधील स्थलांतरित लोकांचे प्रमाण कमी असल्याने कोरोना रोखण्यास मदत झाली आहे. तसेच या गावांमधील बहुतांश शेतमजूर ऊस तोडणीच्या कामाला जात असतात; मात्र गेल्या वर्षभरापासून असलेल्या निर्बंधांमुळे ऊस तोडणी कामगारही गावातच आहेत. स्थलांतराचे प्रमाण १० ते २० टक्के असल्यामुळे कोरोनाची साथ या ठिकाणी वाढली नाही. गावात आलेल्या स्थलांतरित नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे.
कोट...
कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सॅनिटायझर फवारणी, मास्क वाटप करण्यात आले आहे. पोलीस, ग्रामपंचायत, आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामस्थांना सुविधा पुरविल्या जात आहेत. भीती न बाळगता लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करा, असे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळत असल्यामुळे सध्या तरी वऱ्हाणेपाडा कोरोनामुक्त आहे.
- अनिता पवार, सरपंच, वऱ्हाणेपाडा
फोटो फाईल नेम : ०६ एमएपीआर ०२ . जेपीजी
सिताणे येथील आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. वर्षभरापासून डास प्रतिबंधक औषध फवारणीसह सॅनिटायझरची नियमित फवारणी केली जात आहे. आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे. गावात दाखल होणाऱ्या नवीन नागरिकांची ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
- नंदाबाई मंडलिक, सरपंच, सिताणे
फोटो फाईल नेम : ०६ एमएपीआर ०१ . जेपीजी
तालुक्यातील वऱ्हाणेपाडा येथे कोरोना रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. दुकानांमध्ये गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे, तर बाहेरगावाहून गावात दाखल होणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करण्याची सोय करण्यात आली आहे.
- एस.के. साळुंके, ग्रामसेविका, वऱ्हाणेपाडा
फोटो फाईल नेम : ०६ एमएपीआर ०३ . जेपीजी