येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येवलेकरांवर तब्बल दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून, यात अनेक अडचणींना तोंडही द्यावे लागत आहे. शिवाय यात अतिरिक्त वेळ व पैसाही खर्च होत असल्याचे वृत्त ’लोकमत’ने प्रसिद्ध करताच आरोग्य विभागाने तत्काळ येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.येवला शहरात ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आहे. शहरासह तालुक्यातील मोठ्या संख्येने रुग्ण येवला ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावी जाण्यासाठी ई-पास काढावा लागतो व त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्याने येवलेकरांना या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी येवला ते सावरगाव असा दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागत होता. वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी येवलेकर प्रारंभी येवला ग्रामीण रुग्णालयात जात, तेथून त्यांना सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यास सांगितले जात होते. येवला ते सावरगाव साधारणत: दहा किलोमीटर अंतर असून, गरजूंना हा फेरा वाढायचा व त्याबरोबरच आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय ही होत होता. येवलेकरांसाठी येवला ग्रामीण रुग्णालयातूनच वैद्यकीय प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात होती.येवल्यातील नागरिकांची गैरसोय टळावी म्हणून येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. याबरोबरच उपजिल्हा रुग्णालयातील सर्व विभाग सुरू असून, जनतेने शासकीय आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा. याबरोबरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला मास्क वापरावा, हात साबणाने स्वच्छ धुवावे, शारीरिक अंतर राखावे. आरोग्याची कोणतीही तक्र ार असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्कसाधावा.- डॉ. शैलजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधीक्षक,ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, येवला
वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:14 PM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येवलेकरांवर तब्बल दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून, यात अनेक अडचणींना तोंडही द्यावे लागत आहे. शिवाय यात अतिरिक्त वेळ व पैसाही खर्च होत असल्याचे वृत्त ’लोकमत’ने प्रसिद्ध करताच आरोग्य विभागाने तत्काळ येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.
ठळक मुद्देगैरसोय थांबली : येवला येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सुविधा