सर्वतीर्थ टाकेद : ग्रामिण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्ष्यात घेता टाकेद येथे विलगीकरण केंद्र आमदार माणिक कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन करीत लोकार्पण करण्यात आले.तहसीलदार परमेश्वर कासुळे, गट विकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख, घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे आदींची बैठक घेत आमदार कोकाटे यांनी टाकेद येथील आश्रम शाळेत जिल्हा स्तरावर मान्यता प्राप्त करत इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील जवळपास २५ ग्रामपंचायत व चाळीस वाड्या वस्त्यांच्या परिसरासाठी संपूर्ण टाकेद गटासाठी कोविड सेंटर नुकतेच चालू करण्यात आले आहे.लवकरच या शरदचंद्र पवार कोविड सेंटर विलगीकरण सेंटरमध्ये ऑक्सिजन सह सर्व सुख सुविधाही ठेवल्या जाणार असल्याचे आमदार कोकाटे यांनी उद्घाटनादरम्यान सांगितले.यावेळी इगतपुरी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, डॉ. देशमुख, बाळासाहेब गाढवे, डॉ. पंकज गुप्ता,केरु खतेले, सरपंच ताराबाई बांबळे, भिका पानसरे, महेश गाढवे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, नथु पिचड, नामदेव भोसले, विजय पाटील, डॉ. श्रीराम लहामटे, कैलास भवारी, भारती सोनवणे, दौलत बांबळे, आनंदा कोरडे,सोपान टोचे, विक्रम भांगे, सतिष बांबळे, संजय डावरे, शिवा वाणी, ज्ञानेश्वर तांबे आदी उपस्थित होते.टाकेद कोविड सेंटर दाखल झालेल्या रुग्णांना आमदार कोकाटे यांच्या खर्चातून दिवसातून दोन वेळेस जेवण दिले जात आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेण्यासाठी टाकेद हे सोयीस्कर कोविड सेन्टर झाले आहे.
टाकेद येथे विलगीकण केंद्र कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 12:05 AM
सर्वतीर्थ टाकेद : ग्रामिण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्ष्यात घेता टाकेद येथे विलगीकरण केंद्र आमदार माणिक कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन करीत लोकार्पण करण्यात आले.
ठळक मुद्देआमदार कोकाटे यांच्या हस्ते झाला लोकार्पण सोहळा