नांदगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेले पालकमंत्री गिरीश महाजन. समवेत रत्नाकर पवार, राजाभाऊ देशमुख, संजय पवार, बापूसाहेब कवडे आदी.
नांदगाव : जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर असून, चारा डेपो सुरू करण्याबाबतचा निर्णय दोन दिवसात घेतला जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तालुक्यासाठी नदीजोड प्रकल्प हाच एकमेव पर्याय असून, नार-पार प्रकल्पाची फाइल मार्गी लावण्यात आली असून, त्यासाठी निधीची कसलीही अडचण येणार नसल्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथील महादेव मंदिराशेजारील ग्रामपंचायतीच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.नार-पार प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळाचे चित्र बदलेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आचारसंहितेमुळे शासकीय अधिकारी दौºयात सहभागी होत नसल्याने नेमकेपणाचा निर्णय घेण्यास अडचण येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाशी बोलणे झाले असल्याने यंत्रणेबाबतची अडचण दूर झाल्याची माहिती महाजन यांनी दिली.यावेळी डॉ. भारती पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रत्नाकर पवार, तालुका पंचायत समितीच्या सभापती विद्या पाटील, नगराध्यक्ष राजेश कवडे, भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, किरण देवरे, बाजार समितीचे सभापती तेज कवडे, मनमाडच्या माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, सुनील पाटील, गंगादादा त्रिभुवन, सजन कवडे, प्रफुल्ल पारख, पंकज खताळ, सुभाष कुटे, विष्णू निकम, भाऊसाहेब हिरे, गणेश शिंदे, संजय फणसे, विठ्ठल अहेर इत्यादी उपस्थित होते.प्रशासकीय यंत्रणेची उदासीनताज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी पालकमंत्री महाजन यांचे स्वागत केले. रोहिणी नक्षत्र पंधरा दिवसाच्या तोंडावर येऊन ठेपले असून, दुष्काळाच्या प्रश्नावर यंत्रणेला गती मिळाली नसल्याचे त्यांनी महाजन यांच्या निदर्शनास आणून दिले. टँकरची संख्या वाढविणे, शेतकºयांना शेती करण्यासाठी व पुढील हंगामासाठी बी-बियाणे जनावरांचा चारा व पाणी या महत्त्वाच्या समस्या जाणवणार असल्याचे सांगितले. जनावरांसाठी प्रतिहेक्टर पंचवीस हजार किंवा बैलजोडीस दहा हजार रु पये चाºयासाठी द्यावे, अशी मागणी बाणगाव-खिर्डी पंचक्र ोशीतल्या शेतकºयांच्या वतीने बापूसाहेब कवडे यांनी महाजन यांच्याकडे केली. जनावरांसाठी पाण्याचे टँकर देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. माजी आमदार संजय पवार यांनी ४२ खेडी नळयोजनेतून पाणी मिळत नाही. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली.