नाशिक : अत्यंत धोकादायक व अशास्त्रीय पद्धतीने हाताळणी करत सर्पांशी खेळणाऱ्या पंजाबमधील ‘स्नेक हॅण्डलर’ नावाने प्रसिद्ध असलेल्या सर्पमित्राचा नाशकात ‘कोब्रा’जातीच्या सर्पाने काटा काढल्याचे उघड झाले आहे.सर्पाला नैसर्गिक अधिवासात सोडताना किंवा तेथून पकडताना दंश झाल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात होते; मात्र सामनगाव येथील एका बंगल्यात बसलेल्या कथित सर्पमित्रांपुढे स्टंट दाखविताना विक्रमसिंग मल्होतच्या जिवावर बेतल्याचा व्हिडीओ शुक्रवारी (दि.५) व्हायरल झाला. सामनगाव शिवारात अतिविषारी व दुर्मीळ प्रजातीच्या सापासोबत स्टंट करताना सर्पदंश होऊन वन्यजीव सप्ताहात बुधवारी (दि.३) रात्री मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते; मात्र सापाची हाताळणी नेमकी विक्रमसिंग कोठे करत होता? त्याला कोणत्या जातीच्या सर्पाने दंश केला? असे विविध प्रश्न यानंतर उपस्थित झाले.विक्रमसिंग हा सर्प पकडण्यासाठी गेला असता त्यावेळी सर्पदंश झाल्याचे बोलले जात होते; मात्र शुक्रवारी व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सत्यावर प्रकाश पडला.नागाच्या विषाचा मेंदूवर आघातनाग (कोब्रा) हा विषारी सर्प आहे.नागाचा दंश झाल्यानंतर तासाभरात त्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे दंश झाल्यावर तत्काळ उपचार मिळणे आवश्यक आहे. सर्पांना डिवचणे महागात पडणारे असते, हे या घटनेमुळे पुन्हा समोर आले आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या वन्यजिवांशी खेळ करणे म्हणजे स्वत:हून मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे असल्याचे वनविभागाच्या उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी सांगितले.वनविभागाच्या भूमिकेकडे लक्षवन्यजिवांची हाताळणी करून प्रदर्शन मांडणे कायद्याने गुन्हा ठरतो. कायद्याच्या चौकटीत राहून नागरी वसाहतीतून सर्प ‘रेस्क्यू’ करत नैसर्गिक अधिवासात त्याला मुक्त करण्याची परवानगी वनविभागाकडून पडताळणी करून सर्पमित्रांना दिली जाते. त्यामुळे शहरातील कथित सर्पमित्र जे अशाप्रकारच्या स्टंटबाजीचे समर्थन करतात त्यांच्याविषयी वनविभागाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
‘त्या’ सर्पमित्राला जंगलात नव्हे, तर घरातच ‘कोब्रा’ दंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 1:56 AM
अत्यंत धोकादायक व अशास्त्रीय पद्धतीने हाताळणी करत सर्पांशी खेळणाऱ्या पंजाबमधील ‘स्नेक हॅण्डलर’ नावाने प्रसिद्ध असलेल्या सर्पमित्राचा नाशकात ‘कोब्रा’जातीच्या सर्पाने काटा काढल्याचे उघड झाले आहे.
ठळक मुद्देव्हिडीओ व्हायरल : विक्रमसिंगच्या जिवावर बेतला सापांचा खेळ