सिडको मोगल नगर येथील स्वामी समर्थ केंद्रात आयोजित कार्यक्रमात सेवेकऱ्यांशी संवाद साधताना अण्णासाहेब मोरे बोलत होते. जगाच्या पाठीवरील सर्वच देश स्वामी समर्थ कार्याची मागणी करीत आहेत. आपण सर्व सेवेकरी स्वामींचे कार्य करीत आहात हे तळागाळातील लोकांपर्यंत पारदर्शी पोहचायल हवे. हा मार्ग मूल्यशिक्षणातून नवीन पिढीवर संस्कार घडवतो. त्यानंतर जीवनातील घडामोडीत शैक्षणिक गुरू, आध्यात्मिक गुरू आपल्यावर संस्कार करतात. मातीच्या गोळ्याला रूप देऊन योग्य संस्कार घडले तर आदर्श माणूस तयार होतो. माणसाला मनःशांती शोधण्यासाठी जगात अध्यात्माशिवाय पर्याय नसल्याचेही मत अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केले.
चौकट..
रुग्णालयाची माहिती
स्वामी समर्थ केंद्र, त्र्यंबकेश्वर येथे अण्णासाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या कामासाठी लॉकडाऊन काळात तब्बल ११ हजार सेवेकऱ्यांनी जनकल्याण योजनेतून हातभार लावला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी उभ्या राहत असलेल्या रुग्णालयाबाबत यावेळी माहिती देण्यात आली. (फोटो ०८ समर्थ)