लोकमत न्यूज नेटवर्कओझरटाऊनशिप : शेकडो किलोमीटर पायी वाटचाल करणारे आपले वारकरी भगवान विठ्ठलाच्या दर्शनाआधी भक्त पुंडलिकाचे दर्शन का घेतात? याचा सर्वांनी विचार करावा आणि तोच आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील विठ्ठल-रुक्मिणी स्वरूप आई-वडिलांचे रोज दर्शन घ्यावे. त्यांना प्रेम द्यावे, त्यांची मनोभावे सेवा करावी, त्यांना कुठल्याही परिस्थितीत दु:ख होणार नाही, असा संकल्प आजच्या दिवशी करा, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.जय बाबाजी भक्त परिवाराचे राजधानी आश्रम असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळ आश्रमातून देशभरातील भाविकांना फेसबुक लाइव्हद्वारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजच्या युगात बहुतांशी लोक केवळ संपत्ती कमविण्यात व्यस्त आहेत.त्यांनी ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ याप्रमाणे ‘संपत्ती’ जरूर कमवावी. मात्र आपले खरे धन आपली ‘संतती’ आहे हे विसरू नये. आपल्या मुलांना लहान वयातच योग्य संस्कार द्या, असेही शांतिगिरीजी महाराज यांनी सांगितले.दिव्यांगांना लार्जप्रिंट पुस्तकांचे वितरणदिंडोरी : समग्र शिक्षा अभियान, समावेशीत शिक्षण अंतर्गत तालुक्यात विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत लार्जप्रिंट पाठ्यपुस्तकांचे गट-शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.याप्रसंगी विस्तार अधिकारी सुभाष पगार, खंडू सोनार, विशेष तज्ज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, रोहिणी परदेशी, विशेष शिक्षक पौर्णिमा दीक्षित, वैशाली तरवारे, कल्पना गवळी, रिना पवार, अश्विनी जाधव, समाधान दाते, दीपक पाटील आदी उपस्थित होते.
भक्त पुंडलिकाप्रमाणे आईवडिलांची सेवा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:20 IST
ओझरटाऊनशिप : शेकडो किलोमीटर पायी वाटचाल करणारे आपले वारकरी भगवान विठ्ठलाच्या दर्शनाआधी भक्त पुंडलिकाचे दर्शन का घेतात? याचा सर्वांनी विचार करावा आणि तोच आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील विठ्ठल-रुक्मिणी स्वरूप आई-वडिलांचे रोज दर्शन घ्यावे. त्यांना प्रेम द्यावे, त्यांची मनोभावे सेवा करावी, त्यांना कुठल्याही परिस्थितीत दु:ख होणार नाही, असा संकल्प आजच्या दिवशी करा, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.
भक्त पुंडलिकाप्रमाणे आईवडिलांची सेवा करा
ठळक मुद्दे बहुतांशी लोक केवळ संपत्ती कमविण्यात व्यस्त