पिंपळगाव बसवंत : गेल्या कित्येक दिवसांपासून पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड चौफुलीच्या जवळील सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था झाली असून, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी वाहनचालकांना तारेवरची कसरत करून रस्ता सापडावा लागत आहे. त्यामुळे टोल नाका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन सर्व्हिस रोड दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा.
पिंपळगाव ते गोंदिया असलेला पीएनजी टोल नाक्यावर सालाबादप्रमाणे दरवर्षी मोठ्या प्रमाणात मोठे दर वाढवून टोल वसुली केली; मात्र महामार्गाच्या दुरुस्तीकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने ते वाहनधारकांच्या जिवाशी बेतत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा मोठी दुर्घटना या रोड परिसरात होण्याची शक्यता आहे.
-------------------
टोल नाका प्रशासनाने वेळीच सर्व्हिस रोड दुरुस्ती करावी. वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अन्यथा टोल वसुली बंद करावी.
-हर्षल जाधव,अध्यक्ष. जगदंब प्रतिष्ठान, पिंपळगाव
..................................
आर्थिक दृष्टीने चिंचखेड चौफुली खूप महत्त्वाची आहे. तो परिसर व्यावसायिकांनी पूर्ण व्यापलेला आहे. त्याच परिसरात मोठंमोठी हॉस्पिटलदेखील आहेत. त्यामुळे नेहमी वर्दळ असते; मात्र त्याच परिसरात रस्त्याची अशी दयनीय अवस्था संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे.
- आल्पेश पारख, ग्रामपंचायत सदस्य
...........................
प्रशासनाचे दुर्लक्ष
गेल्या कित्येक दिवसांपासून चिंचखेड चौफुलीच्या सर्व्हिस रोडची दुरवस्था झाली आहे. संबंधित प्रशासनाला वेळोवेळी माहिती देऊनही सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीबाबत कोणतीही पावले प्रशासनाने उचलली नाहीत. दोन-चार दिवसात जर दुरुस्तीबाबत टोल नाका प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला नाही तर संबंधित प्रशासनाच्या विरोधात पिंपळगाव नागरिकांतर्फे भव्य आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते केशव बनकर यांनी दिला आहे. (२१ पिंपळगाव २)
210821\21nsk_18_21082021_13.jpg
२१ पिंपळगाव २