लोकमत न्यूज नेटवर्ककोकणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३वरील नाशिक-पिंपळगावदरम्यान मार्गाचे काम सुरू असून, कोकणगाव येथील सर्व्हिस रोडचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. कोकणगाव येथील अण्णा पाटील वस्ती ते जानोरीपर्यंत शेतकरी बांधवांना जीव मुठीत धरून एकेरी बाजूने प्रवास करावा लागत आहे. सर्व्हिस रोडच्या कामामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात होत आहेत.महामार्ग प्राधिकरणाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम तत्काळ मार्गी लावावे. तसेच पथदीप सुरू करावेत अशी मागणी अण्णासाहेब मोरे, बापू मोरे, शंकर गायखे, दीपक लोकणार, सुनील मोरे, धनंजय मोरे, किशोर मोरे, माणिक सरोदे, त्रिभुवन गायकवाड, केशव मोरे आदींनी केली आहे.कोकणगाव ते अण्णा पाटील वस्ती व जानोरी रोडपर्यंत सर्व्हिस रोड करण्यात यावा. कोकणगाव फाटा ते अण्णा पाटील वस्ती व जुना जानू रोडचे अंतर किलोमीटर आहे. हा सर्व्हिस रोड पूर्ण केला नाही तर शेतकऱ्यांना चार ते पाच किलोमीटर फिरून प्रवास करावा लागेल. वारंवार मागणी करूनही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा रोड पूर्ण केला नाही तर टोल बंद आंदोलन करण्यात येईल- पूनम मोरे, माधुरी मोरे, ग्रामपंचायत सदस्य, कोकणगाव