त्र्यंबकेश्वर : येथील माउली धाम ट्रस्टचे रुग्णसेवेचे काम सुरळीत चालू असताना माहिती अधिकाराचा गैरवापर करून मानसिक त्रास दिला जात असल्याचे माउली धामतर्फे सांगण्यात आले. ट्रस्टतर्फे रुग्णसेवा करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले़ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे माउली धामचे मंदिराचे बांधकाम सुरू आहे. यामुळे आदिवासी भागातील नागरिकांना रोजगार मिळाला आहे. केवळ रुग्णसेवेच्या अल्प मोबदल्यातून पैसा उभा केला जात आहे आणि त्यातूनच मंदिर उभारण्याचे काम चालू आहे. अनेकवेळा आमच्याकडच्या औषधांची तपासणी केलेली आहे. या औषधांचा अनेकांना लाभ झालेला आहे. औषधांची गुणवत्ता दाखविली आहे. येथील कारभार पारदर्शक व स्वच्छ आहे. त्यामुळे कोणाचीही फसवणूक आम्ही केलेली नाही. करणार नाही. आम्ही रुग्णेसेवा तर करतोच मात्र त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तिनाथ महाराज वारकरी बांधव आमच्याकडे येऊन थांबतात. या सर्वांची आम्ही जमेल तशी सेवा करतो तर अनेक गरिबांनाही मदत करतो, असे शेवटी देवबाप्पा महाराज यांनी सांगितले. (वार्ताहर)
‘माउली धामतर्फे जनतेची सेवा’
By admin | Published: September 09, 2016 10:46 PM