शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

द्वारका येथील सर्व्हिसरोड आता एकेरीवाहतूक

By admin | Published: June 25, 2016 10:14 PM

कोंडीवर उपाय : वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्ग

नाशिक : द्वारका सर्कल हे महत्त्वाचे ठिकाण असून, या चौकात धुळे व पुणे बाजूकडून येणारी वाहने तसेच शहरातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होते. द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून द्वारका चौकाकडे सर्व्हिसरोडने होणारी वाहतूक एकेरी करण्यात आली असून, या मार्गासाठी वाहतूक शाखेने पर्यायी मार्ग दिले आहेत. वडाळानाका (साई प्रीतम हॉटेल) कडून सर्व्हिसरोडने द्वारका सर्कलकडे जाणारी वाहने आता सर्व्हिसरोडने न जाता ही वाहने आग्रारोडने उड्डाणपुलाखालून द्वारकाकडे जातील. तसेच पखालरोडकडून संतोष मोटार गॅरेज जवळून सर्व्हिसरोडने द्वारका सर्कलकडे जाणारी वाहने सर्व्हिसरोडने वडाळा नाका साई प्रीतम हॉटेल जवळून आग्रारोडने द्वारकाकडे जातील.द्वारका हॉटेलकडून सर्व्हिसरोडने टाकळी चौफुलीकडे जाणारी वाहने आता आग्रारोडने उड्डाणपुलाखालून टाकळी चौफुलीकडे वळतील. नानावली बाजूकडून ट्रॅक्टर हाउस जवळून झाकीर हुसेन व शिवाजी चौक कथडाकडून सर्व्हिसरोडने द्वारका चौकाकडे येणारी वाहने आता ट्रॅक्टर हाउस टाकळी चौफुली मार्गे आग्रारोडने इतरत्र जातील. त्याचप्रमाणे वडाळा नाका, नागसेननगर, वोक्हार्ट हॉस्पिटलकडून सर्व्हिसरोडने द्वारकाकडे येणारी वाहने आता वडाळा नाका उड्डाणपुलाखालून आग्रारोडने द्वारका बाजूला जातील. द्वारका चौकातून बागवानपुरा बाजूकडे जाणाऱ्या वाहनांनादेखील एकेरी मार्ग करण्यात आला असून, या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक आता सारडा सर्कलला यू टर्न मारून बागवानपुऱ्याकडे जातील.