नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात शिंदे व सिद्धपिंप्री येथे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मात्र, लोकसंखेच्या व भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टिने व एकलहरे गणातील सामनगाव, कोटमगाव, एकलहरेगाव, सिद्धार्थनगर, गंगावाडी, मोहगाव, बाभळेश्वर, हिंगणवेढा, माडसांगवी व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते गैरसोयीचे ठरते म्हणून मध्यवर्ती ठिकाण म्हणुन सामनगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे. शिंदे व सिद्धपिंप्री ही दोन्ही ठिकाणे १० ते १५ किलोमीटरच्या अंतरावर असल्याने सामनगाव परिसरातील रुग्णांना गैरसोयीचे होते. सामनगाव परिसरातील ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालय नसल्याने कोरोनाच्या महामारीत व इतर साथरोगावेळी रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे सामनगाव या मध्यवर्ती ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी द्यावी, अशी मागणी विजय जगताप यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.
सामनगावला आरोग्य केंद्र उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:12 AM