नाशिक : वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट या दोन्ही परीक्षा आता नवीन अभ्यासक्रमानुसार होणार असून, यातील नेट परीक्षा आॅनलाइन, तर सेट परीक्षा आॅफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.नाशिक जिल्ह्यातून सेट परीक्षेसाठी जवळपास दहा हजार, तर सेट परीक्षेसाठी सहा ते सात हजार उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ३५वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) येत्या २३ जून रोजी होणार असून, या परीक्षेसाठीचे वेळापत्रक विद्यापीठातर्फे जाहीर झाले आहे, तर राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा दि. २० ते २८ जून या कालावधीत होणार आहे.सेट परीक्षेतील पहिल्या प्रश्नपत्रिकेत ६० ऐवजी ५० प्रश्न असतील. हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागतील, तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना १०० प्रश्न सोडवावे लागतील. सेट परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांमधून सहा टक्के उमेदवार पात्र ठरविले जाणार आहेत. खुल्या वर्गासाठी ४० टक्के, तर आरक्षित प्रवर्गासाठी ३५ टक्के गुण मिळविण्याचे निकष यासाठी लावण्यात आले आहेत. परीक्षेविषयी अधिक माहितीसाठी उमेदवारांना पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून, नेटसाठी एनटीएच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.दोन्हीही परीक्षांसाठी दोन पेपरतीनशे गुणांसाठी परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २० ते २८ जूनदरम्यान नेटची आॅनलाइन परीक्षा होणार आहे. डिसेंबर २०१८ मध्ये प्रथमच नेट पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. नव्या अभ्यासक्रमावर आधारित दोन पेपरची नेट परीक्षा होणार असून, पहिल्या पेपरमध्ये ५० प्रश्नांसाठी १०० गुण, तर दुसरा पेपर संबंधित विषयावर आधारित १०० प्रश्नांसाठी २०० गुणांसाठी असे दोन पेपर होणार आहे. या परीक्षेचा निकाल जुलैमध्ये जाहीर होईल. नेट-सेट परीक्षेसाठी यापूर्वी तीन पेपर द्यावे लागत होते. त्यात बदल करण्यात आला असून, आता दोन्हीही परीक्षांत दोनच पेपर होणार आहेत.
सहायक प्राध्यापकपदासाठी २३ जूनला ‘सेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:50 PM