नाशिक : जिल्ह्यात व परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाळू तस्करी रोखण्यासाठी त्या त्या तालुक्यातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी अपयशी ठरल्यामुळे वाळू तस्करीच्या तक्रारी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे होऊ लागल्यामुळे आता थेट जिल्ह्णातील वाळू तस्करी रोखण्यासाठी भरारी पथक गठित करण्यात आले असून, हे पथक जिल्हाधिकाºयांच्या अखत्यारीतच कामकाज करणार आहे. त्यामुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.नाशिक जिल्ह्यातील नद्यांतील वाळूचे लिलाव अद्याप झालेले नसून तरीदेखील तस्करांकडून चोरी-छुप्या पद्धतीने वाळूचा वारेमाप उपसा केला जात आहे. अशातच नंदुरबार, शहादा, सारंगखेडा या भागातून मोठ्या प्रमाणावर बनावट पावत्यांचा आधार घेऊन रात्री-अपरात्री नाशिकमध्ये चोरीच्या वाळूचे शेकडो ट्रक आणले जात आहेत. त्यातून शासनाने मोठे नुकसान केले जात असल्याच्या घटना घडत आहेत. शिवाय वाळूतस्करांची दादागिरी वाढल्यामुळे पकडलेले वाळूचे ट्रक चक्क तहसील कार्यालयाच्या आवारातून पळविले जात आहेत. हा सारा प्रकार पाहता विद्यमान महसूल अधिकारी वाळूमाफियांना चाप लावण्यात अपयशी ठरले असून, त्यातील काहींचे वाळूमाफियांशी असलेले संबंधही लपून राहिलेले नाहीत. अशा पार्श्वभूमीवर गौण खनिजाची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हाधिकाºयांपुढे उभे ठाकल्याने जिल्ह्यासाठी त्यांच्या अखत्यारीत जिल्हा भरारी पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख तहसीलदार शिवकुमार आवळकंठे हे असणार असून, त्यांच्या सोबत १ नायब तहसीलदार व २ मंडल अधिकारी व ३ तलाठी याचा समावेश आहे. जिल्हाधिकाºयांकडे लघुसंदेश, व्हॉट्सअॅपद्वारे ज्या तक्रारी प्राप्त होतील त्याच्या आधारे हे पथक कारवाई करणार असून, जिल्हाधिकारी अचानक तपासणीचे आदेश देतील त्यावेळी पथकाने तत्काळ कारवाई करायची आहे. वाळूमाफियांवर कारवाई करताना आणखी कर्मचाºयांची गरज भासल्यास पथकाने त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांकडून जादा कुमक मागविण्याची मुभाही पथकाला देण्यात आली आहे. आवळकंठे यांनी मालेगाव व निफाड तालुक्यात वाळूमाफियांवर केलेली कडक कारवाई पाहता त्यांच्या नियुक्तीने वाळूमाफियांचे धाबे तर दणाणलेच; परंतु वाळूमाफियांशी संबंध ठेवून असलेल्या महसूल कर्मचारी, अधिकाºयांनाही धडकी भरली आहे.
वाळू तस्करी रोखण्यासाठी भरारी पथक गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 1:13 AM
नाशिक : जिल्ह्यात व परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाळू तस्करी रोखण्यासाठी त्या त्या तालुक्यातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी अपयशी ठरल्यामुळे वाळू तस्करीच्या तक्रारी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे होऊ लागल्यामुळे आता थेट जिल्ह्णातील वाळू तस्करी रोखण्यासाठी भरारी पथक गठित करण्यात आले असून, हे पथक जिल्हाधिकाºयांच्या अखत्यारीतच कामकाज करणार आहे. त्यामुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
ठळक मुद्देतहसीलदाराची नियुक्तीजिल्ह्यात करणार कारवाई