नाशिक : सरकारी कामात भ्रष्टाचार झाल्यापासून ते पोटचा मुलगा त्रास देत असल्याच्या तक्रारींचा पाऊस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांकडून झाला. नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींचा महिनाभरात निपटारा करण्याचे आदेश जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.येथील नियोजन भवनात सकाळी ११ वाजता गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, आमदार अनिल कदम, आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, जि. प. बांधकाम सभापती मनीषा पवार, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अनिल लांडगे, उत्तर महाराष्टÑ संघटनमंत्री किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदी उपस्थित होते. यापुढे दर दोन महिन्यांनी अशाप्रकारे जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. पहिल्या सत्रात ग्रामीण भागातील तालुकानिहाय तक्रारींचे निराकरण करण्यात आले. नाशिक, निफाड, दिंडोरी, पेठ या क्रमानुसार तालुकानिहाय नागरिकांनी उपस्थित केलेल्या तक्रारींचे वाचन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर व उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी केले. सर्वाधिक तक्रारी या निफाड तालुक्यातील होत्या. जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, अमृता पवार, मंदाकिनी बनकर यांनी त्यांच्या गटातील विकासकामे मंजूर करण्याबाबत पत्र दिले होते. अशोक आवारे, सुशीला पाटील, शिवाजी कोठुळे, साहेबराव निरगुडे, सोमनाथ पगारे यांनी वैयक्तिक अडचणी व समस्या मांडल्या, तर नारायण शिंदे यांनी निफाड साखर कारखाना सुरू करावा, यासाठी शेतकºयांची मागणी असल्याचे सांगितले. त्यावर याबाबत तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. शिवरस्ते मंजूर होत नसल्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्यानंतर आमदार अनिल कदम यांनी याबाबत एकत्रित बैठक घेऊन शिवरस्त्यांचा प्रश्न निकाली काढावयास हवा, अशी सूचना केली. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी याबाबत एकत्रित बैठक घेण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. शारदा शेलार व सिंधूताई कदम यांनी पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळण्याची मागणी केली. त्यांना आठ दिवसांत यासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रे पाहून लाभ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिले. नाशिक, दिंडोरी, पेठ तालुक्यांतूनही अनेक तक्रारींचा पाऊस पडला.भ्रष्टाचार : भाजपा तालुकाध्यक्षाची तक्रार पेठ भाजपा तालुकाध्यक्ष भरत कामडी यांनी पेठ तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्याचे पुरावेच आपण सादर केले असल्याचे सांगितले. पेठ नाशिक रस्त्याचे काम सुरू असताना दहा अपघात होऊन चार जणांचे बळी गेले आहेत. संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्याकडून मुख्यसेविका ४० टक्के पोषण आहाराचे कमिशन खाते, त्याचेही आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगितले. यासर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करून १५ दिवसांत जिल्हाधिकाºयांकडे अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. दिंडोरीला विमान कारखानाच्तुकाराम जोेंधळे यांनी दिंडोरी तालुक्यातील बहुतांश जमिनींचे अधिग्रहण औद्योगिक विकास महामंडळाने केले आहे. एचएएलसारखा एखादा मोठा प्रकल्प दिंडोरीत आणल्यास जिल्हावासीय आपले नाव कायमचे लक्षात ठेवतील, असे सांगितले. त्यावर महाराष्टÑ औद्योेगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिंडोरीत भूसंपादन सुरू झाले आहे. स्वीडन येथील फायटर प्लेन बनविण्याच्या एका कंपनीने दिंडोरीत विमान कारखाना सुरू करण्याबाबत उत्सुकता दाखविली आहे. त्याबाबत सोमवारी(दि.३०) नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. गिरीश महाजन यांनीही जिल्ह्णात मोठे उद्योग येण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.
तक्रारींचा महिनाभरात निपटारा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 1:31 AM