त्र्यंबकेश्वर : तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त (दि.१९) त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या होणाºया गर्दीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद, तालुका तहसील कार्यालय, पोलीस यंत्रणा, परिवहन महामंडळ, वीज, वनविभाग, उपजिल्हा रु ग्णालय आदी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. रविवारीदेखील (दि.१८) नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी पेठ-त्र्यंबकेश्वरचे उपाधीक्षक भीमाशंकर ढोले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांच्यासह गावात पायी फिरून बंदोबस्ताचे नियोजन केले. त्र्यंबकेश्वर मंदिरातदेखील बंदोबस्ताचे नियोजन केले.रविवारीच गावात भाविकांनी गर्दी केली आहे. सोमवारी गावात खासगी वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. यावर्षी तिसºया श्रावण सोमवारी भाविकांना अनुकूल परिस्थिती असल्याने प्रदक्षिणार्थींची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. रविवारी रात्री नऊ-दहा वाजता परिक्रमा करण्यास निघतील. काही भाविक रात्री १२ वाजेपासून फेरीस जात असतात. वयोवृद्ध भाविक पहाटे चार-पाच वाजेपासून फेरीस सुरु वात करतात. दुपार नंतर परत येतात. प्रदक्षिणा करणाऱ्यांनी रस्त्यावर प्लॅस्टिक कचरा, कागद, बाटल्या रस्त्याच्या बाजूला टाकू नये. शेत तुडवित जाऊ नये. शेतीचे नुकसान करू नये, असे फेरी मार्गावरील शेतकरी बांधवांनी कळविले आहे.त्र्यंबकेश्वरला कडेकोट पोलीस बंदोबस्त १ अपर पोलीस अधीक्षक, ३ पोलीस उपाधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, २८ सहायक पोलीस निरीक्षक, ४३ वाहतूक पोलीस, २८० पोलीस कर्मचारी, ८० महिला पोलीस, ७०० होमगार्ड, २ बीडीडीएस पथक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज आहेत.
पोलीस अधीक्षकांकडून बंदोबस्ताचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 2:10 AM
तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त (दि.१९) त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या होणाºया गर्दीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद, तालुका तहसील कार्यालय, पोलीस यंत्रणा, परिवहन महामंडळ, वीज, वनविभाग, उपजिल्हा रु ग्णालय आदी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
ठळक मुद्देतिसरा श्रावणी सोमवार : त्र्यंबकला भाविकांची गर्दी