शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

निमा निवडणुकीत  सिन्नरच्या दोन जागांवर समझोता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:55 AM

निमा निवडणुकीत मंगळवारी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. बॅनर्जी-खरोटे यांच्या एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनलने सिन्नरच्या दोन जागांसाठी समझोता करून राठी-नहार यांच्या एकता पॅनलला धक्का दिला आहे. सिन्नर वगळता अन्य जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

सातपूर: निमा निवडणुकीत मंगळवारी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. बॅनर्जी-खरोटे यांच्या एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनलने सिन्नरच्या दोन जागांसाठी समझोता करून राठी-नहार यांच्या एकता पॅनलला धक्का दिला आहे. सिन्नर वगळता अन्य जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनल लढण्यासाठी सज्ज झाले होते. त्यामुळे एकता पॅनलमध्ये फूट पडू नये म्हणून तब्बल नऊ दिवस चर्चेचे गुºहाळ सुरू होते. तरीही एकमत न झाल्याने अखेर एकतामध्ये फूट पडून दोन गट तयार झाले आहेत. एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने हरिशंकर बॅनर्जी-उदय खरोटे यांचे एकता पॅनल, किशोर राठी -आशिष नहार यांचेही एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनल अशा तीन पॅनलमध्ये सरळसरळ लढत होत आहे. तीन पॅनलमध्ये सरळसरळ निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असताना सोमवारी माघारीच्या दिवशी रात्री उशिरा नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. सिन्नरसाठीच्या अतिरिक्त उपाध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. माघारीच्या दिवशी सोमवारी बॅनर्जी-खरोटे यांच्या एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनल यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार अरु ण चव्हाणके, शिवाजी आव्हाड, डी. जी. ढोबळे यांनी नाट्यमयरीत्या माघार घेऊन आता उद्योग विकास पॅनलचे एम. जी. कुलकर्णी आणि राठी-नहार यांच्या एकता पॅनलचे सुधीर बडगुजर यांच्यात लढत होणार आहे, तर सिन्नरच्या अतिरिक्त सचिव पदासाठीदेखील राठी-नहार यांच्या पॅनलचे किरण खाबिया आणि बॅनर्जी-खरोटे यांच्या पॅनलचे संदीप भदाणे यांच्यात सरळसरळ लढत होणार आहे. सिन्नरच्या या दोन्ही जागांसाठी राठी-नहार यांच्या पॅनलच्या विरोधात दोनही पॅनलने गटबंधन केले असल्याचे सांगण्यात आले आहे.  सिन्नर, सातपूर, अंबड येथील मतदारांची संख्या मोठी असल्याने या मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न जात आहे. सिन्रला ६५७ मतदार, अंबडला १००७, सातपूरला ७१६, नाशिक परिसर ४३७, दिंडोरी ५८, इगतपुरी ३७, इतर ५३ असे २९६५ मतदार आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकMIDCएमआयडीसी