नाशिकरोड : नाशिकरोडन्यायालयाच्या फिरत्या (मोबाइल) लोकन्यायालयात ६७ दाव्यांमध्ये समझोता होऊन १५ लाख ७२ हजार रुपये दंड व नुकसानभरपाई जमा झाली.नाशिकरोड न्यायालयात सोमवारी आयोजित फिरत्या मोबाइल लोकन्यायालयाचे उद्घाटन नाशिकरोडचे प्रमुख न्यायाधीश मयूरा यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश आरती शिंदे, न्यायाधीश प्रभाकर आवले, नाशिकरोड वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुदाम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात लोकन्यायालयाचे महत्त्व सांगितले. लोकन्यायालयात न्यायाधीश मयुरा यादव अॅड. शरद महाजन अॅड. संजय मुठाळ यांच्या पॅनलने काम बघितले. लोकन्यायालयात ९० केसेस पैकी ६७ केसेसमध्ये समझोता झाला. त्यामधून १५ लाख ७२ हजार ८८९ रु पये दंड व नुकसानभरपाई जमा झाली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन अॅड. उमेश साठे यांनी केले. यावेळी अॅड. श्याम हांडगे, अॅड. संग्राम पुंडे, अॅड. ए. एस. कुलकर्णी, अॅड. मुस्तफा शेख, अॅड. मुकुंद पाठक, अॅड. प्रमोद मालोदे, अॅड. ज्ञानेश्वर प्रसन्ना, अॅड. निकम, कर्मचारी दीपक कदम, किरण कर्डिले, मनोज जाधव, जयश्री शेलके, मिलिंद पाठक, भामरे, चौधरी, जावरे आदी उपस्थित होते.
नाशिकरोडला लोकन्यायालयात ६७ दाव्यांमध्ये समझोता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:38 AM