लोहोणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाची यशस्वी सांगता झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वसाकाने चालू गळीत हंगामात एक लाख ४४ हजार ३१५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.डी. देसले यांनी दिली. चालू गळीत हंगामासाठी सुरुवातीला आलेल्या तांत्रिक व आर्थिक अडचणी तसेच पुरेशा प्रमाणात ऊसतोडणी मजुरांची उपलब्धता न झाल्याने कारखाना पूर्ण क्षमतेने चालवता आला नाही. पुढील गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी वसाका व्यवस्थापनाने आत्तापासून नियोजन व पूर्वतयारी सुरू केली आहे, असेही बी. डी. देसले यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर, अभिमन पवार, बाळासाहेब बच्छाव, धनंजय पवार, सहायक निबंधक संजय गीते, माजी अध्यक्ष संतोष मोरे, रामदास देवरे, महेंद्र हिरे, माणिक निकम, विलास निकम, तांत्रिक सल्लागार एस. डी. चव्हाण आदी उपस्थित होते.
वसाकाच्या गळीत हंगामाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:29 AM