सुरगाणा : प्रत्येक मनुष्यांने शरीरातील सहा विकार दुर केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होवू शकत नाही. तसेच भगवंतावरील प्रेम हे गोकुळातील गौळणी प्रमाणे केले असता आजही आपल्यावर येणारे संकट भगवंत स्वत: दुर करणारच असे स्पष्ट मत सद्गुगुरु शामराव महाराज (अजंग) धुळेकर यांनी हनुमान जयंती निमित्ताने काल्याच्या किर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता प्रसंगी व्यक्त केले.सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील देवळा (ख) येथे गेल्या १२ वर्षापासून आत्मउन्नती व विश्वशांती स्वानंदगुरु भक्तप्रेमळ मंडळाच्या वतीने चालु असलेल्या भागवत सप्ताहाचा तपपुर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला.यावेळी राजेंद्र महाराज कुकुडमुंडा, देविदास महाराज वाघमारे, वारकरी साहीत्य परिषद नाशिक जिल्हा सचिव नवनाथ महाराज गांगुर्डे चांदवड तसेच वारकरी साहीत्य परिषद नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष शामराव महाराज सोनवणे अजंगकर यांच्या किर्तन सेवा झाल्या. या कार्यक्र माला तिसगाव येथील लोकशाहीर बंडू नाना गांगुर्डे, सुरगाणा तालुका वारकरी साहीत्य परिषद अध्यक्ष रमेश महाराज मुरे, वसंत महाराज गळवड तसेच सुरगाणा तालुक्यातील पळसन, शिरीषपाडा, बुबळी, मनखेड, जाहूला, गडवड, पहूची बारी येथील भाविकांनी कार्यक्र माचा लाभ घेतला.
भागवत सप्ताहाच्या तपपुर्ती सोहळ्याची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 7:18 PM
सुरगाणा : प्रत्येक मनुष्यांने शरीरातील सहा विकार दुर केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होवू शकत नाही. तसेच भगवंतावरील प्रेम हे गोकुळातील गौळणी प्रमाणे केले असता आजही आपल्यावर येणारे संकट भगवंत स्वत: दुर करणारच असे स्पष्ट मत सद्गुगुरु शामराव महाराज (अजंग) धुळेकर यांनी हनुमान जयंती निमित्ताने काल्याच्या किर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता प्रसंगी व्यक्त केले.
ठळक मुद्दे भागवत सप्ताहाचा तपपुर्ती सोहळा